महापालिकेत भाजप नेतृत्वात होणार बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 03:25 AM2019-11-22T03:25:32+5:302019-11-22T03:25:54+5:30
राज्यात सत्तेचे गणित बिघडल्यामुळे भाजप पालिकेतही विरोधी बाकावर बसण्याची शक्यता
मुंबई : भाजपचे पालिकेतील विद्यमान गटनेते मनोज कोटक लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. ते खासदार झाल्यामुळे भाजपच्या अन्य नगरसेवकाला गटनेतेपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र राज्यात सत्तेचे गणित बिघडल्यामुळे भाजप पालिकेतही विरोधी बाकावर बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यासाठी आक्रमक नगरसेवकाची गटनेतेपदी वर्णी लागणार आहे.
गेली सात वर्षे पालिकेतील भाजपचे गटनेतेपद मनोज कोटक यांच्याकडे होते. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोटक यांना खासदारकीची लॉटरी लागली. त्यांच्या दिल्ली वाºया वाढल्याने पालिका कामासाठी त्यांना वेळ मिळेनासा झाला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नवी नियुक्ती होईल. ज्येष्ठ नगरसेवक अतुल शाह, प्रकाश गंगाधरे, प्रभाकर शिंदे आणि अभिजीत सामंत यांचे नाव गटनेतेपदासाठी चर्चेत आहे.