राज्यातील एमएचटी-सीईटीसह अन्य परीक्षांच्या तारखांमध्ये बदल
By रेश्मा शिवडेकर | Published: March 22, 2024 10:06 PM2024-03-22T22:06:46+5:302024-03-22T22:07:26+5:30
Mumbai News: इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, एलएलबी अशा काही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांकरिता राज्याच्या सीईटी सेलकडून घेतल्या जाणाऱया सीईटींच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. यापैकी फार्मसीच्या प्रवेशांकरिता घेतली जाणारी एमएचटी-सीईटीतील पीसीबी गटाची परीक्षा २२, २३, २४ २८, २९, ३० एप्रिलला होणार आहे.
- रेश्मा शिवडेकर
मुंबई - इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, एलएलबी अशा काही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांकरिता राज्याच्या सीईटी सेलकडून घेतल्या जाणाऱया सीईटींच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. यापैकी फार्मसीच्या प्रवेशांकरिता घेतली जाणारी एमएचटी-सीईटीतील पीसीबी गटाची परीक्षा २२, २३, २४ २८, २९, ३० एप्रिलला होणार आहे. याआधी ही परीक्षा १६ ते २३ एप्रिल दरम्यान होणार होती. तर इंजिनिअरिंगच्या प्रवेशाकरिता घेतली जाणारी पीसीएम गटाची परीक्षा २, ३, ४, ५, ९, १०, ११, १५, १६ मे होणार आहे. ही परीक्षा २५ ते ३० एप्रिल दरम्यान होणार होती. इतरही अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. एमएएच एएसी ही राज्यातील अप्लाईड आर्ट्स अण्ड क्राफ्टसकरिता घेतली जाणारी परीक्षा १२ मे रोजी होणार आहे. तर एमएएच-पीजीपी सीईटीची सुधारित तारीख काही काळाने घोषित करण्यात येईल.
इतर सीईटी आणि त्यांच्या सुधारित तारखा
एमएएच-बीए, बीएससी, बीएड (चार वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स) – १७ मे
एमएएच-एलएलबी (पाच वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स) – १७ मे
एमएच-नर्सिंग – १८ मे
एमएएच-बीएचएमसीटी – २२ मे
एमएएच-बी.बीसीए, बीबीए, बीएमएस,बीबीएम – २७ ते २९ मे