मुंबई : प्रवाशांसाठी पेपरलेस मोबाइल तिकीट अॅप सुविधा सुरू करण्यात आली. मात्र जीपीएससाठी नेटवर्कचा येत असलेला अडथळा आणि त्यामुळे प्रवाशांना तिकीट मिळविताना येत असलेली समस्या पाहता या अॅपमध्ये छापील प्रतही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेच्या क्रिस संस्थेकडून हा बदल केला जाणार असल्याचे क्रिसचे मुंबईतील महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी दिली. अॅपमध्ये कागदविरहित तिकिटाचा पहिला पर्याय आणि दुसरा पर्याय छापील प्रतचा असेल. कागदविरहित तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांना रेल्वेच्या हद्दीत ठरावीक अंतरावर असणे आवश्यक आहे. नंतर प्रवाशांना पासवर्ड मिळेल आणि तो पासवर्ड व मोबाइल क्रमांक एटीव्हीएम मशिनमध्ये टाकल्यावर छापील प्रत मिळेल. (प्रतिनिधी)
पेपरलेस तिकीट अॅपमध्ये होणार बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2016 4:47 AM