मुंबई : सार्वजनिक स्वच्छतेविषयीची जनजागृती करण्यासाठी मंगळवारी चर्चगेट स्थानकात एक आगळावेगळा प्रयोग करण्यात आला. स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी शाळकरी मुलांनी आणि तरुणांनी एकत्र येऊन नृत्याचे सादरीकरण केले व दान उत्सवात अधिकाधिक लोकांनी सहभागी होत, म.रे. व प.रेच्या ३६ स्थानकांचे रूपडे पालटण्यासाठी नागरिकांनी सहभाही होण्याचे आवाहनदेखील केले. मुंबई फर्स्ट अँड मेकिंग अ डिफरन्स फाउंडेशनतर्फे २ ते ८ आॅक्टोबर या कालावधीत ‘दान उत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.
रेल्वे स्थानकांचे बदलणार रूपडे
By admin | Published: September 29, 2016 2:21 AM