मुंबई : मुंबई विद्यापीठ संलग्नित कॉलेज प्राचार्य आणि सिनेट सदस्यांकडून मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रियेत बदल करण्यात यावा, अशी मागणी लावून धरण्यात आली होती. अखेर प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकामध्ये विद्यापीठाने काही महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अर्ज विक्री, प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी प्रक्रिया तसेच पुढील मेरिट लिस्ट या सगळ्यातच बदल करण्यात आले आहेत.बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाकडून १२ जून रोजी गुणपत्रिका देण्यात येणार असल्याने व तोच अर्जाचा शेवटचा दिवस असल्याने विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ होण्याची शक्यता महाविद्यालयांकडून व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या मागणीनुसार हा बदल विद्यापीठाने केला आहे.आतापर्यंतची विद्यार्थी नोंदणी :१ जून, २०१८ पासून सुरू करण्यात आलेल्या प्रवेशपूर्व आॅनलाइन नावनोंदणी प्रक्रियेसाठी आतापर्यंत १ लाख १४ हजार ५९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून विविध अभ्यासक्रमांसाठी २ लाख ९७ हजार ७५९ अर्ज केले आहेत.नोंदणी प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रकअर्ज विक्री : ३१ मे २०१८ ते १८ जून २०१८ पर्यंत (कार्यालयीन दिवस)प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी प्रक्रिया :१ जून २०१८ ते १८ जून २०१८अॅडमिशन फॉर्मच्या अर्जाची प्रिंटआऊट घेऊन महाविद्यालयात सादर करण्याची तारीख : १३ जून २०१८ ते १८ जून २०१८ (कार्यालयीन दिवस)पहिली मेरिट लिस्ट :१९ जून २०१८(सायंकाळी ५.०० वा.)दुसरी मेरिट लिस्ट : २२ जून २०१८ (सायं. ५.०० वा.)तृतीय आणि शेवटची मेरिट लिस्ट : २७ जून २०१८ (सायंकाळी ५.०० वाजता)कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे : २० जून २०१८ ते २२ जून २०१८ (सायं. ४.३० वाजेपर्यंत)कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे :२५ जून २०१८ ते २७ जून २०१८ (सायं. ४.३० वाजेपर्यंत)कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे : २८ जून २०१८ ते ३० जून २०१८ (सायं. ४.३० वाजेपर्यंत - कार्यालयीन दिवस)प्रवेशपूर्व आॅनलाइन नावनोंदणी प्रक्रियेच्या सुधारित वेळापत्रकाची विद्यार्थ्यांनी आणि सलंग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे पुढील प्रक्रिया करावी.- डॉ. दिनेश कांबळे, कुलसचिव (प्र.), मुंबई विद्यापीठ
प्रवेशपूर्व नावनोंदणीच्या वेळापत्रकात बदल, मुंबई विद्यापीठाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 1:53 AM