मध्य रेल्वेकडून १२ विशेष गाड्यांच्या वेळेत बदल; १ डिसेंबरपासून सुधारित वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 02:22 AM2020-11-30T02:22:54+5:302020-11-30T07:03:41+5:30

मुंबई-कोल्हापूर विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएएसएमटी) येथून दररोज सकाळी ८.४० वाजता सुटेल.

Changes in the timings of 12 special trains from Central Railway; Revised time from 1st December | मध्य रेल्वेकडून १२ विशेष गाड्यांच्या वेळेत बदल; १ डिसेंबरपासून सुधारित वेळ

मध्य रेल्वेकडून १२ विशेष गाड्यांच्या वेळेत बदल; १ डिसेंबरपासून सुधारित वेळ

Next

मुंबई : मध्य रेल्वेने १२ विशेष गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. या विशेष गाड्या १ डिसेंबरपासून सुधारित वेळ, थांब्यासह चालविण्यात येतील.

मुंबई-कोल्हापूर विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएएसएमटी) येथून दररोज सकाळी ८.४० वाजता सुटेल. विशेष गाडी कोल्हापूर येथून दररोज सकाळी ८.१५ वाजता सुटेल. मुंबई-सोलापूर विशेष गाडी सीएएसएमटी येथून दररोज २२.४५ वाजता सुटेल. विशेष गाडी सोलापूर येथून दररोज २२.४० वाजता सुटेल. मुंबई-पुणे विशेष गाडी सीएएसएमटी येथून दररोज ०५.४० वाजता सुटेल. विशेष गाडी पुणे येथून दररोज १८.३५ वाजता सुटेल. मुंबई-पुणे विशेष गाडी सीएएसएमटी येथून दररोज १७.१० वाजता सुटणार आहे. विशेष गाडी पुण्याहून रोज ७.१५ वाजता सुटेल. मुंबई-लातूर विशेष गाडी सीएएसएमटी येथून २१.०० वाजता सुटेल. विशेष गाडी लातूर येथून २२.३० वाजता सुटेल. या गाड्यांसह एकूण १२ विशेष गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

पुणे-अजनी विशेष गाडी दर शनिवारी
पुणे-अजनी विशेष गाडी दर शनिवारी पुणे येथून २२.०० वाजता सुटेल. विशेष गाडी दर रविवारी अजनीहून १९.५० वाजता सुटेल. पुणे-अमरावती विशेष गाडी दर बुधवारी पुणे येथून १५.१५ वाजता सुटेल. विशेष गाडी दर गुरुवारी अमरावतीहून १८.५० वाजता सुटेल. पुणे-अजनी विशेष गाडी दर मंगळवारी पुणे येथून १५.१५ वाजता सुटेल. विशेष गाडी दर शुक्रवारी अजनी येथून १९.५० वाजता सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३५ वाजता पोहोचेल. तर मुंबई-आदिलाबाद गाडी सीएएसएमटीहून दररोज १६.३५ वाजता सुटेल. 

Web Title: Changes in the timings of 12 special trains from Central Railway; Revised time from 1st December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :localलोकल