गणपती विसर्जनानिमित्त ठाण्यातील वाहतुकीत बदल

By admin | Published: September 24, 2015 12:00 AM2015-09-24T00:00:09+5:302015-09-24T00:00:09+5:30

ठाणे शहरात २७ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन मिरवणुकांमुळे कोणत्याही प्रकारे कोंडी होऊन वाहतुकीस अडथळा होऊ नये, याकरीता ठाणे शहरातील विविध मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे

Changes in traffic in Thane during Ganpati year | गणपती विसर्जनानिमित्त ठाण्यातील वाहतुकीत बदल

गणपती विसर्जनानिमित्त ठाण्यातील वाहतुकीत बदल

Next

ठाणे : ठाणे शहरात २७ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन मिरवणुकांमुळे कोणत्याही प्रकारे कोंडी होऊन वाहतुकीस अडथळा होऊ नये, याकरीता ठाणे शहरातील विविध मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यात नवी मुंबईहुन येणाऱ्या एनएमटी बसेसना विटावापर्यंतच प्रवेश दिला जाणार आहे.
हे बदल पुढील प्रमाणे आहेत.
मीनाताई ठाकरे चौकाकडून टेंभी नाक्याकडे येणाऱ्या वाहनांना सिव्हील कॉर्नर येथून पुढे येण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने पर्यायी मार्ग सिव्हील कॉर्नर -जी.पी.ओ.- कोर्टनाका - आंबेडकर पुतळा - जांभळीनाका - बाजारपेठमधून जनता फॅशन कॉर्नर-अशोक सिनेमा मार्गे ठाणे स्टेशनकडे जातील. तर
कळवा बाजूकडून टेंभीनाका मार्गे ठाणे स्टेशनकडे जाणाऱ्या या सर्व वाहनांना आंबेडकर पुतळा येथून प्रवेश बंद केला आहे. त्यांना पर्यायी मार्ग म्हणून ही वाहने आंबेडकर पुतळा येथून डावीकडे वळून जांभळीनाका-बाजार पेठ मधून जनता फॅशन कॉर्नर-अशोक सिनेमा मार्गे ठाणे स्टेशनकडे जातील.
आंबेडकर पुतळा-सुभाष पथने व खारकर आळीकडून जांभळीनाका येथून टॉवरनाका मार्गे गडकरी सर्कल-नौपाडाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जांभळीनाका येथून टॉवर नाका मार्गे गडकरी सर्कल-नौपाडाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जांभळी नाका येथून प्रवेश बंद केला आहे. ही सर्व प्रकारची वाहने जांभळीनाका—बाजार पेठ (सुभाषपथ) जनता फॅशन कॉर्नर-अशोक सिनेमा- आंबेडकर चौक-गोखलेरोड-कल्पना केंद्र-घंटाळी चौक- मयुरी हॉटेल-तीन पेट्रोल पंप-पुढे एल.बी.एस.मार्गे किंवा सोपान चौक मार्गे इच्छीत स्थळी जातील.
ठाणे स्टेशन येथून गावदेवी मार्गे शिवाजी पथने मिनाताई ठाकरे चौक व कळवा बाजूकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना गावदेवी क्रॉस येथून प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग ही वाहने ठाणे स्टेशन येथुन गोखले रोडने कल्पना केंद्र-महात्मा फुले मार्गे-घंटाळी चौक-तिन पेट्रोल पंपा-पुढे एल.बी.एस.मार्गाने सरळ मिनाताई ठाकरे चौक किंवा ठाणे स्टेशन येथून आंबेडकर चौक-अशोक सिनेमा-एस.टी.आऊट गेट-चेंदणी कोळीवाडा-सिडकोरोड मार्गे कळवा बाजूकडे जातील.
मूस चौक ते गडकरी सर्कल, व टॉवरनाका ते मूस चौक या रोडवर (तलावपाळी परिसर) गणपती विसर्जनाची वाहनांखेरीज इतर सर्व वाहने उभी करण्यास मनाई केली आहे. नौका विहार तलावपाळी येथे गणपती विसर्जनासाठी आलेली वाहने ही टॉवर नाका ते मुस चौक दरम्यान उभी राहतील (सॅटीस प्रकल्पाच्या ठिकाणी).
दत्त मंदीर समोरील घाट व जिवन पांगे घाट (टॉवर नाका) येथे गणपती विसर्जनासाठी आलेली वाहने गणपती मूर्ती उतरविल्यानंतर परफेक्ट ड्रायव्हींग स्कूल ते प्रमोद कोल्ड्रींक हॉऊस (सेंट जॉन शाळेच्या भिंती लगत) उभी करावीत. या नियमनाचा भंग करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई केली जाणार
आहे.

Web Title: Changes in traffic in Thane during Ganpati year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.