विसजर्नासाठी वाहतुकीत बदल
By Admin | Published: September 3, 2014 01:15 AM2014-09-03T01:15:51+5:302014-09-03T01:15:51+5:30
गणोश विसजर्न शांततेमध्ये व निर्विघ्नपणो पार पाडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे.
नवी मुंबई : गणोश विसजर्न शांततेमध्ये व निर्विघ्नपणो पार पाडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. वाशीतील शिवाजी चौकात वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी या परिसरात वाहनांना प्रवेशबंदी घोषित करण्यात आली असून, वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केला आहे.
नवी मुंबईमध्ये गणोशोत्सव काळात वाहतूककोंडी होऊ नये यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. उत्सवाच्या दोन दिवस अगोदर मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. आता विसजर्नादरम्यानही वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक तेथे वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात येत आहेत. महापालिका क्षेत्रतील 23 तलावांमध्ये गणोशविसजर्न होते. यामध्ये वाशीमधील विसर्जन तलावावर भाविकांची सर्वाधिक गर्दी होत असते. ढोलताशांच्या गजरात मिरवणुका निघत असल्यामुळे येथील शिवाजी चौकात वाहतूककोंडी होत असते. ही कोंडी टाळण्यासाठी 4, 8 व 9 सप्टेंबरला या परिसरात प्रवेशबंदी घोषित करण्यात आली आहे. दुपारी 2 ते रात्री 1क् वाजण्याच्या सुमारास ही बंदी लागू असणार आहे.
शिवाजी चौकातून ये - जा करणा:या वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. वाहनधारकांनी या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे उपआयुक्त अरविंद साळवे यांनी केले आहे.
विसजर्नासाठी बदल पुढीलप्रमाणो -
च्ऐरोली, कोपरखैरणोकडून येणारी वाहने ब्लू डायमंड सिग्नल चौकातून कोपरी सिग्नलमार्गे पामबीच रोडवर जाणार
च्रेल्वे स्टेशन व महामार्गावरून येणारी वाहने जुई पुलावरून खाली उतरून
महात्मा फुले चौक व अरेंजा सर्कलवरून पुढे जाणार
च्वाशी सेक्टर 9 ते 12 मधून मुंबईकडे जाणारी वाहने ब्लू डायमंड चौक, कोपरी चौकामार्गे पामबीच रोडवर
च्वाशी सेक्टर 1 ते 8 मधील मुंबई व पुण्याकडे जाणारी वाहने न्यू बॉम्बे स्कूलसमोरून महामार्गाकडे निघणार
च्वाशी सेक्टर 1 ते 1क् मधून कोपरखैरणो, ऐरोलीकडे जाणारी वाहने जुहूगावमार्गे पुढे जातील.
च्तुर्भेकडून वाशीकडे येणारी वाहने अरेंजा सर्कलवरून शिवाजी चौकाकडे न येता कोपरी सिग्नल अथवा महात्मा फुले चौकाकडून इच्छित ठिकाणी जातील.