मुंबईतील जुहू, अंधेरी ते खार पश्चिममध्ये पाणीपुरवठ्यात बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 11:54 PM2021-07-09T23:54:55+5:302021-07-09T23:55:29+5:30
Water: पश्चिम उपनगरातील जुहू, विलेपार्ले, सांताक्रुज व खार (पश्चिम), अंधेरी (पूर्व व पश्चिम) भागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होण्यास तांत्रिक अडचणी निर्णय होत आहेत.
मुंबई - पश्चिम उपनगरातील जुहू, विलेपार्ले, सांताक्रुज व खार (पश्चिम), अंधेरी (पूर्व व पश्चिम) भागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होण्यास तांत्रिक अडचणी निर्णय होत आहेत. या अंतर्गत पाणीपुरवठ्याशी संबधित झडप बदलण्यात येणार आहे. यामुळे या परिसरातील पाणीपुरवठा १३ जुलै २०२१ रोजी बंद अथवा कमी दाबाने होणार आहे.
वेरावली जलाशयाच्या क्रमांक तीनचे भाग दोनचे वांद्रे आऊटलेटवर असलेल्या १२०० मिलि मीटर व्यासाची झडप बदली करण्याचे करण्याचे काम मंगळवार स. १० ते रात्री १० वाजेपर्यंत केले जाणार आहे. या कालावधीत एच पश्चिम, के पश्चिम व के पूर्व विभागातील काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्याचप्रमाणे के पश्चिम व के पूर्व विभागातील काही ठिकाणी पाणीपुरवठा खंडित होणार आहे.
- गिलबर्ट हिल – वेळ.. सकाळी ८.३० ते ११.१५ पाणीपुरवठा कमी दाबाने.
- जुहू-कोळीवाडा (उर्वरित पुरवठा) – स. १० ते दुपारी १२.१५ वाजेपर्यंत पाणीपुरवठा असलेल्या परिसरात सकाळी ८ ते ९.१५ यावेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा.
- चार बंगला – पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १२.१५ ते २.१० वाजेपर्यंत... कमी दाबाने राहील.
-विलेपार्ले (पश्चिम), जे. व्ही. पी. डी., नेहरु नगर – पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.३० ते सायंकाळी ४.५५ वाजेपर्यंत असणा-या परिसरात पाणीपुरवठा खंडित राहील.
- विलेपार्ले (पूर्व) (संपूर्ण विलेपार्ले पूर्व डोमेस्टिक एअरपोर्ट) – पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ५.३० ते रात्री ८, असणा-या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने.
- सहार मार्ग, ना. सी. फडके मार्ग, ए. के. मार्ग, गुंदवली गावठाण, तेली गल्ली, साईवाडी, जिवा महाले मार्ग– पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ५.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत असणा-या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.
- मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, जुना नागरदास मार्ग – वेळ रात्री ८ ते १०.३० वाजेपर्यंत असणा-या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.
- खोतवाडी, गझदरबंध, एस. व्ही. मार्ग (खार), लिंकींग रोड (खार), सांताक्रुझ (पश्चिम), खार (पश्चिम) – पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ६.३० ते ९ वाजेपर्यंत.