उच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या वेळेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:07 AM2021-05-25T04:07:10+5:302021-05-25T04:07:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ७ जूनपासून सुरू उच्च न्यायालयाच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे. सामान्यतः अकरा ...

Changes in the working hours of the High Court | उच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या वेळेत बदल

उच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या वेळेत बदल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ७ जूनपासून सुरू उच्च न्यायालयाच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे. सामान्यतः अकरा वाजता सुरू होणारे कामकाज १०:३० वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे. कोरोनामुळे कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला नाही, हे उच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या नोटीसनुसार, ७ जूनपासून केवळ मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज ११ ऐवजी १०:३० वाजता सुरू होईल व संध्याकाळी पाचऐवजी ४:३० वाजता कामकाज संपेल. तसेच जेवणाची सुट्टी दुपारी २ ते ३ ऐवजी १:३० ते २:३० अशी असेल. उच्च न्यायालयाच्या महानिबंधकांनी सही केलेल्या नोटीसवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर, औरंगाबाद व गोवा खंडपीठांच्या कार्यालयीन वेळेत बदल केलेला दिसत नाही.

Web Title: Changes in the working hours of the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.