समाजाची मानसिकता बदलत आहे

By admin | Published: February 24, 2017 08:06 AM2017-02-24T08:06:16+5:302017-02-24T08:06:16+5:30

मतदारांची मानसिकता बदलत आहे. समाजाची बदलाची तयारी आहे

Changing the mentality of the community | समाजाची मानसिकता बदलत आहे

समाजाची मानसिकता बदलत आहे

Next

मुंबई : मतदारांची मानसिकता बदलत आहे. समाजाची बदलाची तयारी आहे. त्यामुळे आगामी पाच वर्षांत कामाद्वारे मी जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचून आगामी निवडणुकीत विजयी होईन, अशी प्रतिक्रिया प्रभाग १६६मधील पहिली तृतीयपंथी उमेदवार प्रिया पाटील यांनी दिली.
महापालिका निवडणुकीतील पहिली तृतीयपंथी उमेदवार म्हणून प्रिया पाटीलची चर्चा होती. शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे अशा प्रमुख पक्षांच्या विरोधात प्रियाने मोर्चेबांधणीस सुरुवात केली. प्रचारात मतदारांनी योग्य साथ दिली़ आठ दिवसांच्या प्रचारात ७० मतदारांनी मला साथ दिली. त्यामुळे आगामी निवडणुकीत ७० चे ७ हजार मतदार करण्याचा निर्धार पाटीलने व्यक्त केला. निवडणुकीतील पराभवाचे वाईट वाटत नाही, उलट समाजाची मानसिकता बदलत असल्याचा आनंद आहे. मला मत दिलेल्या मतदारांचेदेखील मी आभार मानते. (प्रतिनिधी)

Web Title: Changing the mentality of the community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.