बांगलादेशी मजुरांची चारित्र्य पडताळणी कठीण, सैफवरील हल्ल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 13:20 IST2025-01-21T13:19:48+5:302025-01-21T13:20:10+5:30

Mumbai News: अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या निवासस्थानी हल्ला करणारा मोहम्मद शरिफुल इस्लाम शहजाद  (३०) याला वांद्रे पोलिसांनी ठाण्यातून एका कन्स्ट्रक्शन साइटवरून अटक केली.

Character verification of Bangladeshi laborers difficult, security issue on the agenda after attack on Saif | बांगलादेशी मजुरांची चारित्र्य पडताळणी कठीण, सैफवरील हल्ल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

बांगलादेशी मजुरांची चारित्र्य पडताळणी कठीण, सैफवरील हल्ल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

 मुंबई - अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या निवासस्थानी हल्ला करणारा मोहम्मद शरिफुल इस्लाम शहजाद  (३०) याला वांद्रे पोलिसांनी ठाण्यातून एका कन्स्ट्रक्शन साइटवरून अटक केली. आरोपी हा बांगलादेशी असल्याचे तपासात उघड झाल्यानंतर विकासक आणि बांधकाम व्यावसायिक कामगारांची चारित्र्य पडताळणी करणे गरजेचे असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात मजूर हा बांगलादेशी आहे की नाही त्याची पडताळणी करणे अशक्य असल्याचे या वर्गाकडून सांगण्यात येत आहे.

तीन वर्षांत २२२ जण हद्दपार
राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि सोलापूर, नाशिक जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून  बांगलादेशींवर कारवाई केली होती. भारतातील वास्तव्यासाठी या आरोपींनी बनावट कागदपत्रांआधारे आधार कार्ड, पॅन कार्ड बनवून घेतल्याचे उघड होते. 
अवघ्या पाचशे ते दोन हजारांत त्यांची भारतीय ओळखपत्र बनवण्यात आल्याचे तपासात उघड झाले. त्यानुसार तीन वर्षांत ६९६ बांगलादेशी नागरिकांना अटक करत २२२  बांगलादेशीना  मायदेशी परत पाठवण्यात आले आहे.

पोलिसांची घ्या मदत 
श्रमिकांच्या नोंदी आणि पडताळणी प्रक्रियेचे नियतकालिक ऑडिट आणि प्रत्येक कामगाराच्या तपशीलवार फायली आवश्यक आहेत. 
शहरांमधील प्रकल्पांसह, मजुरांची योग्य ओळख आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यासाठी पोलिसांची मदत घेता येईल, वरिष्ठ पोलिस अधिकारी सांगतात.

सरकारने आम्हा रिअल इस्टेट डेव्हलपर्स, बांधकाम एजन्सींना कामगारांची संपूर्ण पार्श्वभूमी पडताळणी तसेच ओळख सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. 
हे कामगार बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि ईशान्येतील राज्यांतील असतात. 
अनेकदा त्यांना विकासक किंवा कंत्राटदारांद्वारे प्रकल्पाच्या ठिकाणी तसेच जवळच्या तात्पुरत्या कामगार शिबिरांमध्ये आउटसोर्स ठेवले जाते. 
आम्ही कंत्राटदारामार्फत आधार कार्ड, पॅन कार्ड तपासतो. मात्र, ते बनावट असल्यास आमच्याही मर्यादा पडतात, असे विकासकांकडून सांगण्यात आले.

Web Title: Character verification of Bangladeshi laborers difficult, security issue on the agenda after attack on Saif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.