Join us

नेपाळमधून आणलेला १ कोटींचा चरस साठा जप्त

By मनीषा म्हात्रे | Published: January 03, 2024 7:37 PM

अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या कांदिवली युनिटने मुंबईतून एक कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले आहे.

मुंबई: अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या कांदिवली युनिटने मुंबईतून एक कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. या कारवाईत दोघांना अटक केली आहे. बोरिवली परिसरात दोघे जण ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचत दोघांना अटक केली. या कारवाईत एकूण १ कोटी १८ लाखांचे चरस जप्त करण्यात आले. याप्रकरणी गुन्हा नोंदवत दोघांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. हा चरस जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि नेपाळ मधून महाराष्ट्रात येत असल्याचे कारवाईतून समोर आले. हा चरस नेपाळमधून आणल्याचे उघड झाले. याप्रकरणी दोघांकडे कसून चौकशी सुरु आहे.

अंमली पदार्थ विरोधी विभागाने २०२३ मध्ये अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी १०६ गुन्हे दाखल केले असून त्यामध्ये एकूण २२९ आरोपीना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या ताब्यातून ५३.२३ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा  अंमली पदार्थ जप्त केला आहे. तसेच चरस जप्त केल्याप्रकरणी एकूण ११ गुन्हे  दाखल करत २९ तस्करांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ११ कोटींपेक्षा अधिक किंमतीचा चरस साठा जप्त करण्यात आला आहे.

टॅग्स :मुंबईअमली पदार्थ