‘फोर्स वन’साठी हेलिकॉप्टर भाड्याने घेणार

By admin | Published: February 23, 2016 02:49 AM2016-02-23T02:49:01+5:302016-02-23T02:49:01+5:30

अत्यंत महत्त्वाच्या ‘फोर्स वन’साठी राज्य सरकार लवकरच भाड्यावर हेलिकॉप्टर घेणार आहे आणि दहशतवादी हल्ला झाल्यास विनाविलंब विमान उपलब्ध व्हावे, यासाठी नागरी उड्डाण विभागाशी

Charges for the 'Force One' helicopter | ‘फोर्स वन’साठी हेलिकॉप्टर भाड्याने घेणार

‘फोर्स वन’साठी हेलिकॉप्टर भाड्याने घेणार

Next

- डिप्पी वांकाणी,  मुंबई
अत्यंत महत्त्वाच्या ‘फोर्स वन’साठी राज्य सरकार लवकरच भाड्यावर हेलिकॉप्टर घेणार आहे आणि दहशतवादी हल्ला झाल्यास विनाविलंब विमान उपलब्ध व्हावे, यासाठी नागरी उड्डाण विभागाशी करार करणार आहे. दहशतवादी हल्ला झाल्यास कारवाईसाठी विमान मिळविण्यात औैपचारिकता पूर्ण करताना होणारा विलंब टाळण्यासाठी हा करार असेल.
सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या १४ मिनिटांत ‘फोर्स वन’चे कमांडोज कारवाईसाठी तयार होतात. दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले असल्यास, त्या ठिकाणी पोहोचण्यात वेळ वाया जाऊ नये, म्हणून या कराराचा प्रस्ताव आहे. मुंबईत २६/११ चा हल्ला झाल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांच्या (एनएसजी) धर्तीवर ‘फोर्स वन’ची स्थापना करण्यात आली आहे.
कालिना येथे असलेल्या या ‘फोर्स वन’कडे ३५० प्रशिक्षत कमांडोज आहेत. धोक्याचा भोंगा (सायरन) वाजल्यानंतर हे कमांडोज संपूर्ण सशस्त्र अशा वाहनामध्ये तयार अवस्थेत बसण्यासाठी केवळ १४ मिनिटे घेतात. २६/११ सारख्या हल्ल्यात त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच जास्त जीवितहानी होते. त्यामुळे ते टाळण्यासाठी हल्ल्याच्या ठिकाणी कमांडोजना विमानाद्वारे नेणे गरजेचे असते. आणीबाणीच्या प्रसंगात नागरी उड्डयन महासंचालकांना (डीजीसीए) विमान तैैनात करण्याचे विशेष अधिकार आहेत. अशा
प्रसंगात आम्ही औैपचारिक
व्यवस्था करतो, परंतु त्यातही नियम आहेत.
आम्ही नागरी उड्डयन अधिकाऱ्यांशी औैपचारिक करार करून हे नियम कमीत कमी असावेत, असे सूचविले आहे. याचा उद्देश असा आहे की, आणीबाणीच्या प्रसंगात आम्ही फक्त नागरी उड्डयन विभागाच्या महासंचालकांशी संपर्क साधू व ते प्रक्रियेतील विलंब टाळून विमान तत्काळ तैैनात करतील, असे या सूत्रांनी सांगितले.
आपले स्वत:चे हेलिकॉप्टर असावे, असा विचार केल्यानंतर ते खूपच खर्चिक होत असल्याचे आम्हाला आढळले, असे या सूत्रांनी म्हटले. आम्हाला हेलिकॉप्टरची गरज काही रोज नसते. आमचे स्वत:चे हेलिकॉप्टर असेल, तर ते ठेवण्यासाठी जागा लागेल व वर्षभर त्याची
देखभाल करावी लागेल. म्हणून आम्ही असा विचार केला की, हेलिकॉप्टर वार्षिक भाडे तत्त्वावर घ्यावे,
म्हणजे आम्हाला पाहिजे, त्या वेळी
ते उपलब्ध असेल, असा प्रस्ताव मांडला.

Web Title: Charges for the 'Force One' helicopter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.