ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - शीना बोरा हत्येप्रकरणी सीबीआयने पीटर मुखर्जीविरोधात विशेष सीबीआय न्यायालयात आऱोपपत्र दाखल केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सीबीआयने पीटरवर हत्येचा कट रचण्याचा तसंचं पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लगावला आहे.
सीबीआयने पीटर मुखर्जीविरोधात ठोस पुरावे हाती लागल्याचा दावा केला असून, महत्वाच्या साक्षीदाराचा जबाबदेखील बंद लिफाफ्यात सुपूर्द केला आहे. शीना बोरा हत्या प्रकरणात मुंबई आणि रायगड पोलिसांनी काय भुमिका बजावली याचादेखील सीबीआय तपास करत आहे.
पीटर हा या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा पती आहे. हत्येचा कट रचण्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली 19 नोव्हेंबरला पीटर मुखर्जीला अटक करण्यात आली होती. 2012 मध्ये शीना बोराची हत्या करुन रायगडमधील जंगलात नेऊन तिचा मृतदेह जाळण्यात आला होता.