Join us

राणा कपूर, वाधवानविरोधात दोषारोपपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 5:07 AM

संस्थापक राणा कपूर, दिवाण हाउसिंग फायनान्स लि.चे प्रवर्तक कपिल व धीरज वाधवान यांच्यावर विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सध्या हे तिघेही कारागृहात आहेत.

मुंबई : भ्रष्टाचार व फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने येस बँकेचा संस्थापक राणा कपूर, दिवाण हाउसिंग फायनान्स लि.चे प्रवर्तक कपिल व धीरज वाधवान यांच्यावर विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सध्या हे तिघेही कारागृहात आहेत.राणा कपूरची मुलगी रोशनी कपूर हिलाही आरोपी करण्यात आले आहे. राणा कपूर, वाधवान बंधंूव्यतिरिक्त डीएचएफएल कंपनी, मेसर्स बेलिफ रिअ‍ॅल्टर्स, मेसर्स आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रा.लि. व अन्य एका कंपनीला आरोपी करण्यात आले आहे.येस बँकेने डीएचएफला ४,५०० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी डीएचएफएलने राणा कपूर याला त्याची मुलगी रोशनी कपूरच्या कंपनीद्वारे ६०० कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. रोशनी कपूरच्या कंपनीत तिच्या बहिणी राधा कपूर-खन्ना, राखी कपूर -टंडन या भागीदार आहेत. ईडीनेही या सर्वांवर गुन्हा नोंदविला आहे.