- सचिन लुंगसेमुंबई : महावितरण, टाटा पॉवर आणि टाटा मोटर्स देशातील इलेक्ट्रिक दळणवळणाला चालना देण्यासाठी महत्त्वाच्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन्स उभारणार आहेत. महावितरण ५०० तर टाटा ३०० इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन्स उभारणार असून, साहजिकच यामुळे इंधन कमी जळेल; आणि पर्यावरणाची हानी होणार नाही.टाटा पॉवर आणि टाटा मोटर्सकडून २०२० वर्षाअखेरपर्यंत वेगवान चार्जिंगची सुविधा देणारी ३०० स्टेशन्स उभारली जातील. मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू आणि हैदराबाद अशा पाच महत्त्वाच्या शहरांमध्ये ही स्टेशन्स उभारली जातील. पुण्यात पहिल्या सात चार्जिंग स्टेशन्सचे उद्घाटन करण्यात आले आहे. पुढील दोन महिन्यांत इतर चार शहरांमध्ये आणखी ४५ चार्जर्स बसविण्यात येतील. मुंबईत सध्या टाटा पॉवरच्या ईव्ही सुविधांमध्ये ४२ केंद्रे आहेत. हैदराबाद, बंगळुरू व दिल्ली शहरामध्ये या सेवा उपलब्ध आहेत. विविध ठिकाणी अशी ८५ चार्जिंग केंद्रे सध्या सुरू आहेत.महावितरणला राज्यात विविध ठिकाणी ५०० इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या प्रस्तावास कधीच मान्यता मिळाली आहे. महावितरणकडूनच ही स्टेशन्स उभारली जातील. पुणे आणि अमरावती येथील इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन्स सुरू झाली आहेत. मुंबईत ४, ठाणे ६, नवी मुंबई ४, पनवेल ४, पुणे १०, मुंबई-पुणे महामार्ग १२ आणि नागपूर १२ ठिकाणीदेखील ही स्टेशन्स उभारली जातील. याशिवाय १० सेंटरची आॅर्डर कंत्राटदाराला देण्यात आली आहे. आजघडीला एका इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग सेंटरसाठी महावितरणला २ लाख ५० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. एक इलेक्ट्रिक व्हेइकल चार्ज करण्यासाठी अंदाजे ४५ मिनिटे ते एक तास एवढा कालावधी लागतो.कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्नभारताला ईव्हीसाठी सज्ज करण्यासह कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही बांधील आहोत. भारतीयांना वेगवान ईव्ही चार्जिंग सहज उपलब्ध व्हावे, हा आमचा उद्देश आहे.- प्रवीर सिन्हा, व्यवस्थापकीय संचालक, टाटा पॉवररात्री वाहन चार्ज केल्यास विशेष सवलतइलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन्सचे दर प्रतियुनिट ६ रुपये आहेत. तर, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत वाहन चार्ज केल्यास दरात १ रुपये ५० पैसे सवलत आहे.दोन महिन्यांत चार शहरांत आणखी ४५ चार्जिंग पॉइंटपुण्यात पहिल्या सात चार्जिंग स्टेशन्सचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. पुढील दोन महिन्यांत इतर चार शहरांमध्ये आणखी ४५ चार्जिंग पॉइंट उपलब्ध करून देण्यात येतील. मुंबईत सध्या टाटा पॉवरच्या ईव्ही सुविधांमध्ये ४२ केंद्रे आहेत. या स्टेशन्समुळे इंधनाच्या बचतीसह पर्यावरणाचेदेखील संवर्धन होण्यास मदत होणार आहे.
गाड्यांसाठी ८०० ठिकाणी चार्जिंग ‘बूस्ट’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 6:17 AM