बनावट जीएसटी चलन बनविणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंटला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:24 AM2020-12-14T04:24:23+5:302020-12-14T04:24:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जीएसटी चलनाच्या बनावट पावत्या सादर करून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय वस्तू व सेवा ...

Chartered accountant arrested for making fake GST currency | बनावट जीएसटी चलन बनविणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंटला अटक

बनावट जीएसटी चलन बनविणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंटला अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जीएसटी चलनाच्या बनावट पावत्या सादर करून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या मुंबई पश्चिम अन्वेषण पथकाने एका लेखा परीक्षकाला (सीए) अटक केली. चंद्रप्रकाश पांडे असे त्याचे नाव असून ताे सी.पी. पांडे ॲण्ड असोसिएट्सचा प्रमुख आहे.

पांडेने बनावट पावत्या सादर करून १०.६३ कोटींचा जीएसटी भरल्याचा इनपुट टॅक्स क्रेडिटवर (आयटीसी) मिळविला होता. या कंपनीची वार्षिक उलाढाल अंदाजे ५९.१० कोटी असल्याचे सांगण्यात आले.

पथकाने केलेल्या तपासात पांडेने सी.पी. पांडे असोसिएट्सच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर अनेक कंपन्या तयार केल्या. त्याच्या नावे वस्तू, सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता पावत्या सादर केल्या. सीजीएसटी अधिनियम, २०१७ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्याने पथकाने त्याला ११ डिसेंबरला अटक केली. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

..........................

Web Title: Chartered accountant arrested for making fake GST currency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.