Chartered Plane Crashed In Mumbai : ...यामुळे वाचले इमारतीतील 35-40 कामगारांचे प्राण, मोठा अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 05:51 PM2018-06-28T17:51:47+5:302018-06-28T17:57:15+5:30
ज्या लेनमध्ये हे विमान कोसळले तेथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर जवळपास 35-40 कामगार काम करतात.
मुंबई : घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात चार्टर्ड विमान कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत एका पादचाऱ्यासह विमानातील चारही जणांचा मृत्यू झाला आहे. महिला वैमानिक मारिया कुबेर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत. विमानात बिघाड असल्याचं लक्षात आल्यानंतर मारिया यांनी घाटकोपरमधील मोकळ्या जागेत विमानाचं क्रॅश लँडिंग केले. वैमानिक मारिया यांनी प्रसंगावधान दाखवलं नसतं तर परिस्थिती आणखी भयानक झाली असती. कारण ज्या लेनमध्ये हे विमान कोसळले तेथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर जवळपास 35-40 कामगार काम करतात. ज्यावेळेस हा अपघात घडला त्यावेळेस या सर्व कामगारांची जेवणाची सुट्टी झाली होती. सुदैवानं एकही कामगार तेथे उपस्थित नव्हता. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.
जागृतीनगर जॉगर्स पार्कजवळील परिसर अत्यंत दाटीवाटीचा आहे. विमान दुर्घटना ज्याठिकाणी घडली तो परिसर मोकळा आहे. त्यामुळे मारिया यांनी शेवटपर्यंत विमान मोकळ्या जागी उतरवण्यासाठी प्रयत्न केला आणि विमान रहिवासी ठिकाणी कोसळणार नाही याची दक्षता घेतली. मारिया यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis visits the site of chartered plane crash in Mumbai's Ghatkopar, says, "It is a worrying incident. What were the reasons behind the crash and who is responsible for it needs to be found out." 5 people lost their lives in the crash. pic.twitter.com/G6Aj1VT9UK
— ANI (@ANI) June 28, 2018
#Mumbai: Visuals of wreckage of chartered plane that crashed in Ghatkopar. 5 people lost their lives in the crash that occurred few hours ago. pic.twitter.com/kHyq6hSGVp
— ANI (@ANI) June 28, 2018