Chartered Plane Crashed In Mumbai: वैमानिकाच्या शौर्याला सलाम, प्रसंगावधान दाखवत वाचवले हजारोंचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 02:22 PM2018-06-28T14:22:15+5:302018-06-28T14:24:20+5:30

घाटकोपरमधल्या सर्वोदय रुग्णालयाजवळ चार्टर्ड विमान कोसळल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

Chartered Plane Crashed In Mumbai: Salute to pilot, thousands of lives saved | Chartered Plane Crashed In Mumbai: वैमानिकाच्या शौर्याला सलाम, प्रसंगावधान दाखवत वाचवले हजारोंचे प्राण

Chartered Plane Crashed In Mumbai: वैमानिकाच्या शौर्याला सलाम, प्रसंगावधान दाखवत वाचवले हजारोंचे प्राण

Next

मुंबई- घाटकोपरमधल्या सर्वोदय रुग्णालयाजवळ चार्टर्ड विमान कोसळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात महिला वैमानिकासह इतर तिघांचा मृत्यू झाला असला तरी वैमानिकाच्या प्रसंगावधानानं हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं समजल्यानंतर वैमानिकानं प्रसंगावधान दाखवत गर्दीच्या ठिकाणावरून विमान जागृती इमारतीच्या बाजूला बांधकाम सुरू असलेल्या मोकळ्या ठिकाणी वळवलं आणि तिथेच ते लँडिंग करत असताना कोसळलं.

वैमानिकांना प्रशिक्षणादरम्यान अशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं. त्याच ट्रेनिंगच्या माध्यमातून या वैमानिकानं हजारो लोकांचे प्राण वाचवले आहेत. दुर्घटनेत दुर्दैवानं वैमानिकासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. घाटकोपर पश्चिमेकडच्या जीवदया लेनमधल्या पृथ्वी बिल्डिंगजवळ हा अपघात झाला आहे. सदरचे चार्टर्ड विमान हे जुहू येथून टेस्टिंगसाठी नेत असतानाच दुर्घटनेत एका वैमानिकासह 4 जण आणि एका पादचा-याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.


अग्निशामक दलाच्या गाड्या आणि पोलीस, एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. महिला वैमानिक मारिया कुबेर, सहवैमानिक प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे या चार जणांचा मृत्यू झाला. तर पादचारी गोविंद पंडित यांचाही मृत्यू झाला आहे. या भागातून विमानतळ जवळ असल्यानं प्रशिक्षणासाठी या मार्गाचा अवलंब केला जातो. तसंच चार्टर्ड विमानांचाही हा मार्ग असल्याचीही चर्चा आहे. VTUPZ किंगएअर सी 90 हे अपघातग्रस्त चार्टर्ड विमान असल्याचं समोर आलं आहे.  





   

Web Title: Chartered Plane Crashed In Mumbai: Salute to pilot, thousands of lives saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.