मुंबईत तरुणीचा पाठलाग करणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 11:45 AM2017-08-18T11:45:10+5:302017-08-18T13:41:11+5:30

तरुणीचा स्कुटर वरुन पाठलाग करणाऱ्या दोघांच्या मुसक्या अंबोली पोलिसांनी आवळल्या आहे.

The chase captives were arrested; in just two hours there was a ruckus | मुंबईत तरुणीचा पाठलाग करणाऱ्या दोघांना अटक

मुंबईत तरुणीचा पाठलाग करणाऱ्या दोघांना अटक

Next
ठळक मुद्दे तरुणीचा स्कुटर वरुन पाठलाग करणाऱ्या दोघांच्या मुसक्या अंबोली पोलिसांनी आवळल्या आहे. असीरा तरन्नुम (२५) अस या तरूणीचं नाव आहे. दया नायक आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली असुन गाडीचा अर्धवट नंबर असूनही अवघ्या दोन तासात त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले

मुंबई, दि. 18- गुरुवारी मध्यरात्री कामावरून घरी परतणाऱ्या एका २५ वर्षांच्या तरुणीचा दोन मोटरसायकलस्वार तरुणांनी पाठलाग केल्याची घटना समोर आली आहे.असिरा तरन्नूम असे या पत्रकार तरुणीचे नाव आहे. या तरुणीचा स्कुटर वरुन पाठलाग करणाऱ्या त्या दोन आरोपींच्या मुसक्या अंबोली पोलिसांनी आवळल्या आहे. दया नायक आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली असुन गाडीचा अर्धवट नंबर असूनही अवघ्या दोन तासात त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आल आहे. ते दोघं जण महाविद्यालयीन तरुण असल्याचं अंबोली पोलिसांनी सांगितलं. कली फर्ड सॅम्युएल सुशी अमाना (२५) आणी सागर सिंग(२१) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नवे असून ते अंधेरी पुर्वच्या मरोळचे राहणारे आहेत. 

आणखी वाचा

वजन न घटल्यामुळे महिलेला ५७ हजारांची नुकसानभरपाई

सासरच्या जाचामुळे तरुणाची आत्महत्या


असिरा मीडिया प्रोफेशनमध्ये आहे. ती गुरूवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ऑफिसचं काम आटोपून घरी परतत होती. दोन मोटरसायकलस्वार तरुणांनी आपला पाठलाग केल्याचे तिनं सांगितलं. तिने अंधेरी पश्चिमेकडील चित्रकुट मैदानाजवळून रिक्षा पकडली. रिक्षात बसली असता अचानक दोन मोटरसायकलस्वार तरुणांनी रिक्षाचा पाठलाग सुरू केला. अनेकदा त्यांनी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. मोटरसायकलवर मागे बसलेला एक तरुण असभ्य भाषा वापरत होता. दोघांनी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. मी त्यांचे फोटो काढले. त्यावर ते हसत होते. त्यानंतर मी हेल्पलाईनवर फोन केला. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून लगेच फोन आला. पुढील पोलीस तपासणी नाका असलेल्या रस्त्यावरून रिक्षा घेण्यास त्यांनी सांगितलं. पण रिक्षाचालकाने त्यावेळी माझ्याशी वाद घातला. पण पोलिसांकडे तक्रार करेन, असं सांगितल्यानंतर त्याने रिक्षा तपासणी नाक्याकडे वळवली, असं असिरा म्हणाली. रिक्षा जुहू सर्कलला पोहोचली. तिथे पोलिसांची नाकाबंदी सुरू होती. हे पाहून दोघेही विलेपार्लेच्या दिशेने पसार झाले, असंही तिनं सांगितलं.

या संपूर्ण घटनेनंतर मी घरी पोहचले का हे तपासण्यासाठी पोलिसांनी तीन वेळा फोन केला. असिराने पाठलाग करणाऱ्या दोन तरुणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या तरुणांना ओळखत असाल तर त्यांच्याविषयी माहिती द्या, असं आवाहनही तिने केलं. 

 

Web Title: The chase captives were arrested; in just two hours there was a ruckus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.