छत्रपती शिवाजी महाराजांना ट्विटरची मानवंदना, 'जाणता राजा' ट्रेंडिंगमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 09:33 AM2018-04-03T09:33:46+5:302018-04-03T11:29:44+5:30
सध्या छत्रपति शिवाजी महाराज हा हॅशटॅग तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मुंबई: स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मंगळवारी ट्विटर इंडियाच्या टॉप ट्रेंडलिस्टमध्ये झळकत होते. छत्रपती शिवाजी महाराजांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने अनेक लोकांकडून मोठ्याप्रमाणावर ट्विट केली जात आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ट्विटरच्या ट्रेंड लिस्टमध्ये आहे. सध्या छत्रपति शिवाजी महाराज हा हॅशटॅग तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय, अनेक राजकीय नेत्यांनीही ट्विटच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली आहे.
पेटविली रणांगणे देह झिजविला मातिसाठी...!!!
— PankajaGopinathMunde (@Pankajamunde) April 3, 2018
मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी...!!!
शिवशंभूंची मरूनहि हे स्वराज्य राखण्याची साद आहे...!!!
म्हणूनच लाखो करोडो मावळा येथे महाराजांवर हसत हसत कुर्बान आहे...!
छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!!!
निश्चयाचा महामेरू ।
— Poonam Mahajan (@poonam_mahajan) April 3, 2018
बहुत जनांसी आधारू ।
अखंडस्थितीचा निर्धारू ।
श्रीमंत योगी ।।
हिंदवी स्वराज्य संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त
विनम्र अभिवादन!
मराठा साम्राज्य के संस्थापक वीर शिरोमणि छत्रपति शिवाजी महाराज की पुण्यतिथि पर कोटि-कोटि प्रणाम pic.twitter.com/I0f2lToVRz
— BJP Uttar Pradesh (@BJP4UP) April 3, 2018
रयतेचे राजे, कूळवाडीभूषण, छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन! pic.twitter.com/8l07j49C8W
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 3, 2018
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन! pic.twitter.com/upmUD2fu5X
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 3, 2018