मोठी घोषणा करणारी पोस्ट उदयनराजे भोसलेंनी केली डिलिट; तर्कविर्तकांना पुन्हा उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 05:11 PM2022-02-24T17:11:29+5:302022-02-24T17:11:49+5:30

उदयनराजेंच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर आणि फेसबुकवरती बुधवारी जी मोठ्या घोषणेची पोस्ट करण्यात आली होती.

Chatrapati Udayan Raje Bhosale deletes Facebook And Twitter post making big announcement | मोठी घोषणा करणारी पोस्ट उदयनराजे भोसलेंनी केली डिलिट; तर्कविर्तकांना पुन्हा उधाण

मोठी घोषणा करणारी पोस्ट उदयनराजे भोसलेंनी केली डिलिट; तर्कविर्तकांना पुन्हा उधाण

googlenewsNext

मुंबई : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे कोणत्या-ना-कोणत्या कारणाने मीडियामध्ये चर्चेत असतात. उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलने ओळखले जातात. तसेच, डायलॉगबाजी, कॉलर उडवण्याची त्यांची स्टाईल आदींमुळे ते सोशल मिडियावर चर्चेत येतात. दरम्यान, आता उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत 24 तारखेला साताऱ्यात एक मोठी घोषणा करणार असल्याचे म्हटले होते. मात्र आता ते ट्विट डिलिट करण्यात आलं आहे.

उदयनराजेंच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर आणि फेसबुकवरती बुधवारी जी मोठ्या घोषणेची पोस्ट करण्यात आली होती. ती डिलिट करण्यात आली आहे. त्यामुळे तर्कविर्तक लढवले जात आहेत. तसेच  उदयनराजे आज मोठी घोषणा करणार की, नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आपण सारेच आपल्या भोवती सुरु असणाऱ्या घटना पाहत असतो. काही अयोग्य वाटल्या तर त्या कोणीतरी दुरूस्त करेल अशी केवळ इच्छा आपण व्यक्त करत असतो. आम्ही मात्र एका सामाजिक प्रश्नावर गेली अनेक वर्षे प्रशासकीय बदलांसाठी अनेक प्रयत्न केले. पण ते पुरेसे नाहीत. गेल्या काही दिवसांच्या चिंतनातून आम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणून स्वत:च एक व्यवस्था उभी करण्याचे ठरविले आहे, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटलं होतं. 

Web Title: Chatrapati Udayan Raje Bhosale deletes Facebook And Twitter post making big announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.