मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्याला चोप

By admin | Published: July 7, 2017 06:56 AM2017-07-07T06:56:11+5:302017-07-07T06:56:11+5:30

घरात एकटीच झोपलेल्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या गंगाराम अखाडे (२५) या तरुणाला नातेवाइकांनी बेदम चोप

Chattering a girl with a pornographic girl | मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्याला चोप

मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्याला चोप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घरात एकटीच झोपलेल्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या गंगाराम अखाडे (२५) या तरुणाला नातेवाइकांनी बेदम चोप दिला. त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घाटकोपर परिसरात तक्रारदार १३ वर्षांची मुलगी कुटुंबीयांसोबत राहते.
२ जुलै रोजी दुपारी ती घरात एकटीच झोपली असताना गंगाराम घरात आला. त्याने तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आणि तिला धमकावून निघून गेला. भीतीने मुलीने कुणालाही काही सांगितले नाही. मुलीच्या स्वभावातील बदलामुळे कुटुंबीयांना चिंता लागली. त्यांनी तिच्याकडे अधिक विचारणा केली असता, तिने गंगारामच्या कृत्याला वाचा फोडली. गंगारामविरुद्ध विनयभंग, पॉक्सोचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Chattering a girl with a pornographic girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.