छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 05:32 AM2019-03-01T05:32:49+5:302019-03-01T05:33:09+5:30

मुंबई : पुलवामा हल्ल्यानंतर देशात हाय अलर्ट जारी करण्यात आल्याने मुंबईतही सर्व महत्त्वपूर्ण स्थळांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ...

Chattrapati Shivaji Maharaj international airport tight security arrangements | छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था

Next

मुंबई : पुलवामा हल्ल्यानंतर देशात हाय अलर्ट जारी करण्यात आल्याने मुंबईतही सर्व महत्त्वपूर्ण स्थळांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.


मुंबई विमानतळ हे देशातील व्यस्त विमानतळांपैकी एक विमानतळ आहे. दर तासाला सुमारे ४५ विमानांची वाहतूक या ठिकाणाहून केली जाते, त्यामुळे याला धोका होऊ नये यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे. मुंबईतील टर्मिनल १ वरून काही देशांतर्गत विमानांचे उड्डाण होते तर सर्व आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक व काही देशांतर्गत विमानांची वाहतूक टर्मिनल २ वरून होते. टर्मिनल १ जवळ हवाई नियंत्रण कक्ष असून त्या माध्यमातून विमानांच्या वाहतुकीचे नियंत्रण केले जाते. त्याच परिसरात विमानांना इंधन पुरविणाऱ्या कंपन्यांचे इंधन तळ आहेत. या ठिकाणी घुसखोरी होऊ नये व कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी सुरक्षा व्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. अनोळखी व्यक्तींना या परिसरात प्रवेश करता येऊ नये याची काळजी घेतली जात आहे. संशयास्पद हालचाली करणाऱ्यांवर पाळत ठेवली जात आहे.


विमानतळात प्रवेश करणाºया प्रवाशांची कसून चौकशी व तपासणी केली जात आहे. कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्याची आमची क्षमता आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.


मुंबईच्या सुरक्षेत वाढ, मेट्रो प्रशासनही दक्ष
रस्ते, रेल्वे, मुंबई मेट्रो, समुद्र किनारपट्टी परिसरात बंदोबस्तात वाढ करत, मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथक, फोर्स वन, शीघ्र कृती दल, बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथकआदींकडून शहरातील महत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील ठिकाणी बंदोबस्तात वाढ केली आहे. मेट्रो प्रशासनही दक्ष झाले असून सर्व स्थानकांवरही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Web Title: Chattrapati Shivaji Maharaj international airport tight security arrangements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.