मुंबई : आरेतील रस्त्यांची चाळण झाली असून खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे किरकोळ अपघात वाढले आहेत. येथील मुख्य रस्ता तसेच अंतर्गत रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. दुचाकी वाहने घसरण्याचा घटनांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय खड्ड्यांमुळे येथे मोठी वाहतूककोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.आरे कॉलनीतील खड्ड्यांबाबत आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभाग आरे यांना उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष क्लाईव डायस आणि मुंबई काँग्रेस आदिवासी विभाग अध्यक्ष सुनील कुमरे यांनी नुकतेच निवेदन दिले. आरे प्रशासन येथील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करीत असून युनिट क्र. ४, ६ , ९, १४, १६, ३० तसेच मयूरनगर येथील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे, असा आरोप सुनील कुमरे यांनी केला.
आरेच्या रस्त्यांची झाली चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 1:31 AM