ई-मेल हॅक करून फसवणूक
By admin | Published: July 3, 2014 02:51 AM2014-07-03T02:51:23+5:302014-07-03T02:51:23+5:30
कंपनीचा ई-मेल आयडी हॅक करून फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
नवी मुंबई : कंपनीचा ई-मेल आयडी हॅक करून फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
वाशी सेक्टर १ येथील प्रभाकर नायर यांच्याबाबत ही फसवणूक झाली आहे. आॅक्टोबर १३ मध्ये त्यांच्या कंपनीचा ई-मेल आयडी हॅक करून दोन व्यक्तींनी ही फसवणूक केली आहे. इब्राण मुक्तार शेख आणि रविकुमार सिंग अशी त्यांची नावे आहेत. स्वित्झर्लंड येथील साई ट्रेडिंग ही कंपनी नायर यांच्या कंपनीची ग्राहक आहे. सदर दोघांनी नायर यांच्या कंपनीच्या ई-मेलवरुन साई ट्रेडिंग कंपनीला ई-मेल केला. त्यामध्ये नायर यांच्या कंपनीच्या बँक खात्याऐवजी स्वत:चा गोरेगाव येथील स्टेट बँक आॅफ पटियालाचा खाते नंबर दिला. त्यानुसार साई ट्रेडिंग कंपनीकडून व्यवहाराचे आलेले ४ लाख ७५ हजार रुपये त्यांनी परस्पर हितस्वार्थासाठी वापरले. या फसवणुकीकरिता या दोघांनी त्यांचे कांदिवली येथील अॅक्सिस बँकेचे खाते देखील वापरले आहे. (प्रतिनिधी)