कामाच्या आमिषाने कुटुंबाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:05 AM2021-05-12T04:05:43+5:302021-05-12T04:05:43+5:30

मुंबई : टिळकनगर परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाची रेल्वेमध्ये फूड सप्लायचे काम मिळवून देण्यासाठी दहा लाख रुपये घेत दोन ठगांनी ...

Cheating on the family with the lure of work | कामाच्या आमिषाने कुटुंबाची फसवणूक

कामाच्या आमिषाने कुटुंबाची फसवणूक

Next

मुंबई : टिळकनगर परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाची रेल्वेमध्ये फूड सप्लायचे काम मिळवून देण्यासाठी दहा लाख रुपये घेत दोन ठगांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार चेंबूरमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून टिळकनगर पोलीस तपास करत आहेत.

..........................................................

लॉटरीसाठी गमावले ५७ हजार

मुंबई : भायखळ्यातील एका तरुणावर १२ लाख रुपयांच्या लॉटरीसाठी ५७ हजार रुपये गमाविण्याची वेळ ओढावली आहे. ऑनलाइन ठगांनी लॉटरी लागल्याची बतावणी करत फसवणूक केली आहे. याप्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करून आग्रीपाडा पोलीस तपास करत आहेत.

................................................

तोतया बँक अधिकाऱ्याकडून फसवणूक

मुंबई : बँकेतून बोलत असल्याची बतावणी करत ठग महिलेने एका व्यापाऱ्याकडून त्याच्या क्रेडिट कार्डची माहिती आणि मोबाइलवर आलेले ओटीपी घेत खात्यातील २४ हजारांच्या रकमेवर हात साफ केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून गावदेवी पोलीस तपास करत आहेत.

......................................

Web Title: Cheating on the family with the lure of work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.