Join us

कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक

By admin | Published: February 10, 2015 10:29 PM

घरबांधणीसाठी आर्थिक मदतीची गरज असल्याने फायनान्स कंपनीकडून ३० लाख रुपये कर्ज मिळवून देतो, असे सांगून स्टँप ड्युटीसाठी लागणारे

बोर्लीपंचतन : घरबांधणीसाठी आर्थिक मदतीची गरज असल्याने फायनान्स कंपनीकडून ३० लाख रुपये कर्ज मिळवून देतो, असे सांगून स्टँप ड्युटीसाठी लागणारे २ लाख १० हजार रुपये घेतले. मात्र ४ महिने उलटून गेले तरी कर्ज न दिल्याने अकील फोफलनकर यांनी दिघी सागरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बोर्लीपंचतन येथील अकील अहमद फोफलनकर व त्यांचा मित्र जहीर इब्राहिम परकार यांना बोर्लीपंचतन येथे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी आर्थिक मदतीची गरज होती. त्यामुळे त्यांनी आपले परिचित जहीर हुसेन मदगरी (७०) यांच्या ओळखीतून भूषण संगरत्न जाधव (३१, रा. मितांड, ता. माणगांव) व लियाकत सय्यद अहमद कादरी (५४, रा. म्हसळा, रायगड) यांची भेट घेतली. या दोघांनी एस. फायनान्स कंपनीतर्फे ३० लाख रुपये कर्ज देण्याचे अकील फोफलनकर यांना कबुल केले. मात्र स्टॅम्प ड्युटीसह ७ टक्केप्रमाणे २ लाख १० हजार रुपये खर्च येईल, असे सांगून फोफलनकर व त्याचा मित्र जहीर यांनी प्रथम ३० हजार व नंतर १ लाख ८० हजार रोख रक्कम दिली. इतके पैसे देऊनही कर्ज न देता ४ महिने ही रक्कम स्वत:कडे ठेवली.