Join us  

घर खरेदीच्या नावाने फसवणूक

By admin | Published: May 23, 2014 3:02 AM

मालकीचा भूखंड असल्याचे भासवून एजंट व बांधकाम व्यावसायिकांनी फसवणूक केल्याचा प्रकार खारघरमध्ये घडला आहे

नवी मुंबई : मालकीचा भूखंड असल्याचे भासवून एजंट व बांधकाम व्यावसायिकांनी फसवणूक केल्याचा प्रकार खारघरमध्ये घडला आहे. याप्रकरणी संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये रियल इस्टेट कंपनीचे मालक करीत एम. रावतर, झारा होम्सचे मालक व भागीदार युसूफ शहा, आदित्य इंटरप्रायझेसचे मालक तेजस पटेल यांचा समावेश आहे. या सर्वांनी खारघर सेक्टर ३५ मध्ये प्लॉट नंबर १९ स्वत:च्या मालकीचा असल्याचे सांगितले होते. येथील प्रस्तावित इमारतीचा नकाशा तयार करण्यात आला होता. या इमारतीमधील ३७० चौरस फुटांच्या दोन सदनिका मुंबईमधील अब्दुल पगारकर यांना विकण्यासाठी व्यवहार केला होता. त्यांच्याकडून ८ जानेवारी २०१२ ते मेपर्यंत १० लाख रुपये रोख घेतले होते. पैसे घेवून घर दिले नाही. याविषयी चौकशी केली असता सदर भूखंडही दुसर्‍याच व्यक्तीचा असल्याचे निदर्शनास आले आहे. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच पगारकर यांनी खारघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)