घर स्वस्तात देण्याच्या नावाखाली फसवणूक
By admin | Published: December 24, 2016 03:32 AM2016-12-24T03:32:41+5:302016-12-24T03:32:41+5:30
म्हाडाचे घर स्वस्तात देण्याच्या नावाखाली नागरिकांना गंडा घालणाऱ्या भामट्याला रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी बेड्या
मुंबई : म्हाडाचे घर स्वस्तात देण्याच्या नावाखाली नागरिकांना गंडा घालणाऱ्या भामट्याला रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सीताराम दगडू खोपकर असे आरोपीचे नाव आहे.
वाकोला येथील रहिवासी असलेले निवृत्त हळदणकर यांची २०१५मध्ये खोपकरसोबत भेट झाली. खोपकर याने त्यांना २१ लाखांत म्हाडाचे घर मिळवून देण्याचे आमिष दाखवले. मुंबईत स्वत:चे घर होणार या आनंदात त्यांनीही त्याला होकार दिला. सुरुवातीला १९ लाख रुपये भरले. उर्वरित दोन लाख फ्लॅटचा ताबा मिळाल्यावर देण्याचे ठरले. मात्र पैसे घेऊनही फ्लॅटचा ताबा देण्याबाबत खोपकर टाळाटाळ करत असल्याचे हळदणकरांच्या लक्षात आले. त्यांनी गेल्या महिन्यात रफी अहमद किडवाई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला.
आरोपी रफी अहमद किडवाई परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. त्याने अनेकांना गंडा घातल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला. (प्रतिनिधी)