मेट्रो-३ च्या कामाचा १४०० घरांना जाच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 04:12 AM2019-02-07T04:12:19+5:302019-02-07T04:12:40+5:30

अंधेरी पूर्वेकडील भंडारवाडा येथील १४०० रहिवाशांना भूमिगत मेट्रो प्रकल्प ३ च्या कामामुळे त्रास सहन करावा लागत आहे. मरोळ परिसरात दुपारच्या वेळेस मेट्रोच्या कामासाठी सुरुंग लावण्यात येतात.

Check out 1400 houses of Metro-3 work | मेट्रो-३ च्या कामाचा १४०० घरांना जाच

मेट्रो-३ च्या कामाचा १४०० घरांना जाच

Next

मुंबई : अंधेरी पूर्वेकडील भंडारवाडा येथील १४०० रहिवाशांना भूमिगत मेट्रो प्रकल्प ३ च्या कामामुळे त्रास सहन करावा लागत आहे. मरोळ परिसरात दुपारच्या वेळेस मेट्रोच्या कामासाठी सुरुंग लावण्यात येतात. आजूबाजूच्या परिसरातील घरांना हादरे बसून काही घरांना भेगा पडल्या आहेत. येथील काही घरांना धोका असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

धोका निर्माण झालेल्या घरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रहिवाशांनी ही समस्या एमएमआरसी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.तरीही त्याची दखल घेतली जात नाही. उपाययोजना केली जात नाही. सततच्या कामामुळे घराची भिंत कोसळून जिवीतहानी किंवा वित्तहानी होण्याची भिती रहिवाशांना आहे, अशी माहिती मनसेचे अंधेरी पूर्व विधानसभेचे विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांनी दिली.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून यासंदर्भात सांगण्यात आले की, मरोळ परिसरात सुरु असलेल्या मेट्रो ३ च्या भुयारीकरणामुळे कोणत्याही घरांना तडे गेलेले नाहीत. कामामुळे परिसरातील घरांना कोणताही धोका नाही. हे भुयारीकरण या भागातील अत्यंत कठीण खडकात आणि उथळ भूभागात होत असल्याने रहिवाशांना कंपने जाणवत आहेत. ही कंपने धोकादायक नाहीत. कंपनांचे नियमित मोजमाप करण्यात येत असून ही कंपने विहित मर्यादेच्या आतच आहेत. ही बाब रहिवाशांना समजावून सांगण्यात आली आहे़

काही दिवसांपूर्वी भूयारी कामाला सुरुवात झाली. काम सुरु झाल्यानंतर घरांना तडे जाऊ लागले. याबाबत प्रशासनाशी पत्र व्यवहार करण्यात आला. त्यानंतर मेट्रोच्या अधिकाºयांनी काही घरांची पाहणी केली. जसजसे काम पुढे गेले तसे पुढील घरांना तडे जात आहेत. आतापर्यंत १५ ते २० घरांना तडे गेले आहेत. तसेच मेट्रोच्या कामादरम्यानचा आवाज आणि हादरे मोठ्या प्रमाणात जाणवत असून त्याचा त्रास होत आहे. - नवीद शेख, स्थानिक

टनेल उत्खनन हे अद्ययावत टनेल बोरींग मशीनद्वारे अत्यंत सुरक्षित पद्धतीने करण्यात येत आहे. यापूर्वी, मरोळ गावठाण येथील रहिवाशांकडून तेथील घरांमध्ये होणाºया हादºयासंदर्भात तक्रार केली होती. तेथील रहिवाशांसोबत बैठक घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी बैठकीत टनेल बोरींग मशीनची माहिती देण्यात आली. त्यांनी अनुभवलेले हादरे हे हादरे नसून टनेल बोरींग मशीन व खडक यांच्या घर्षणामुळे तयार झालेला आवाज आहे. त्यामुळे त्यांच्या इमारती व घरांना कुठल्याही प्रकारचा धोका नाही,अधिकाºयाचे म्हणणे आहे़

Web Title: Check out 1400 houses of Metro-3 work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.