चेंबूरमध्ये दोन गांजा विक्रेत्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 19:30 IST2019-07-14T19:29:32+5:302019-07-14T19:30:47+5:30
जप्त केलेल्या गांजाची किंमत ३,३०० रुपये असल्याचे चुन्नाभट्टी पोलिसांनी सांगितले.

चेंबूरमध्ये दोन गांजा विक्रेत्यांना अटक
मुंबई: चेंबूर येथील पुनम पेट्रोल पंपाच्या परिसरात संशस्यापदरित्या फिरत असलेल्या दोघाजणांकडून शनिवारी पोलिसांनी १ हजार ग्रॅम गांजा जप्त केला. संजीव शंकररव कुलाबकर (वय ६१ रा. चेंबूर) व सुमित रविंद्र कसबे (२४)अशी त्यांची नावे असून उपनिरीक्षक निलेश कानडे व हवालदार गायकवाड, धुमक गावडे हे रात्रपाळीत गस्त घालित असताना त्यांनी ही कारवाई केली.
जप्त केलेल्या गांजाची किंमत ३,३०० रुपये असल्याचे चुन्नाभट्टी पोलिसांनी सांगितले. उपनिरीक्षक कानडे हे सहकाऱ्यांसमवेत पुनम पेट्रोल पंपाजवळील सावित्रीबाई फुले गृहनिर्माण सोसायटीच्या समोर दोघेजण संशयास्पदरित्या फिरत होते. त्यांना हटकून झडती घेतली असता त्यांच्याकडे ९९० ग्रॅम गांजा मिळून आला. परिसरातील गर्दुल्यांना ते त्यांची विक्री करण्यासाठी आणल्याचे त्यांनी कबुली दिली.