Join us

चेंबूरमध्ये अवतरले प्रति वाराणसी!

By admin | Published: September 02, 2014 1:32 AM

मुंबईकरांना त्याचे दर्शन घडवणा:या चेंबूरच्या सह्याद्री क्रीडा मंडळाने यंदा वाराणसीतील गंगा घाटाचा देखावा साकारला आहे.

चेंबूर : दरवर्षी देशातील विविध प्रार्थनास्थळांचे हुबेहुब देखावे सादर करून मुंबईकरांना त्याचे दर्शन घडवणा:या चेंबूरच्या सह्याद्री क्रीडा मंडळाने यंदा वाराणसीतील गंगा घाटाचा देखावा साकारला आहे. हा देखावा पाहण्यासाठी भक्तांची गर्दी टिळकनगरमध्ये होत आहे. 
मुंबईत राहून देशातील तसेच राज्यातील विविध धार्मिक स्थळांचे दर्शन घडवून आणण्याचा मंडळाचा नेहमीच प्रयत्न असतो. यापूवी शनिवार वाडा, लाल किल्ला, डिस्ने लँड असे विविध देखावे मंडळाकडून साकारले आहेत. तर गेल्या वर्षी चित्रपटसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फिल्मसिटीचा देखावा उभारला होता. त्यामुळे यंदा गंगा नदीचे महत्त्व पटवून देणारा गंगा घाटाचा देखावा मंडळाने साकारला आहे. चित्रपटसृष्टीतील नामवंत कला निर्देशक तपन रॉय यांनी 21 जूनपासून हा देखावा साकारण्यास सुरुवात केली. दोन महिने शंभर कामगारांनी हा देखावा उभारला आहे. 
वाराणसीतील गंगा घाटावर शंभरपेक्षा अधिक घाट आहेत. मात्र यातील भोसले घाट, तुलसी घाट, मनमंदिर घाट, अहिल्याबाई घाट, प्रयाग घाट, दिग्पतिया घाट, गंगामहल घाट असे निवडक घाट या ठिकाणी साकारले आहेत. 8क् फूट बाय 2क्क् फूट असा हा हुबेहूब गंगा घाटाचा देखावा या ठिकाणी उभारल्याचे सह्याद्री क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राहुल वाळंज यांनी दिली. या गंगा घाटाच्या देखाव्यासाठी सह्याद्री क्रीडा मंडळाने गंगा नदीचे एक हजार लीटर पाणी आणले. घाटावर असलेली मंदिरे आणि दिवे लागल्यानंतर गंगा घाटाचे उजळणारे मनोहारी रूप येथे पाहायला मिळत आहे. सुरक्षेची खबरदारी म्हणून परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. 5क्क् कार्यकर्ते सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेत आहेत. (प्रतिनिधी)