चेंबूर पोटनिवडणुकीत दोन अपक्ष उमेदवारांची माघार
By admin | Published: December 29, 2015 02:06 AM2015-12-29T02:06:15+5:302015-12-29T02:06:15+5:30
येत्या १० जानेवारी रोजी चेंबूरच्या प्रभाग १४७मध्ये पालिकेची पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेसह एकूण ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यातील २ अपक्ष उमेदवारांनी
मुंबई : येत्या १० जानेवारी रोजी चेंबूरच्या प्रभाग १४७मध्ये पालिकेची पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेसह एकूण ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यातील २ अपक्ष उमेदवारांनी शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतले आहेत.
काँग्रेस नगरसेवकाने राजीनामा दिल्यानंतर चेंबूरमधील प्रभाग क्रमांक १४७मधील नगरसेवकपद अनेक महिन्यांपासून रिक्त होते. त्यासाठी येत्या १० जानेवारीला येथे पोटनिवडणूक होत आहे. सेना
आणि भाजपाची युती असल्याने या ठिकाणी अनिल पाटणकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात
आली आहे, तर काँग्रेसकडून राजेंद्र नगराळे हे उमेदवार आहेत. २९ डिसेंबर ही अर्ज माघारीची शेवटची तारीख होती.
घाटला-खारदेव नगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून येथील राजकारणामध्ये अनेक बदल झाले आहेत. शिवसेनेच्या शाखाप्रमुखाने सेनेमधून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
काँग्रेसच्या तिकिटावर लढणारे राजेंद्र नगराळे अनेक वर्षे मनसेत होते. काँग्रेसमध्ये दाखल होऊन त्यांनी उमेदवारीही मिळवली आहे. त्यामुळे काँग्रेसनेदेखील त्यांच्यासाठी कंबर कसली आहे. (प्रतिनिधी)