चेंबूर मतदारसंघ : मतदारांची घरघर कधी सुटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 02:39 AM2019-09-29T02:39:04+5:302019-09-29T02:39:20+5:30

चेंबूर विधानसभा क्षेत्रात घरांचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देऊन अनेकांनी निवडणूक लढविली, विजयही मिळविला. येथील झोपड्या असो किंवा वसाहती त्यांचा पुनर्विकासाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे.

Chembur Constituency: When will the constituency leave? | चेंबूर मतदारसंघ : मतदारांची घरघर कधी सुटणार?

चेंबूर मतदारसंघ : मतदारांची घरघर कधी सुटणार?

Next

मुंबई : चेंबूर विधानसभा क्षेत्रात घरांचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देऊन अनेकांनी निवडणूक लढविली, विजयही मिळविला. येथील झोपड्या असो किंवा वसाहती त्यांचा पुनर्विकासाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. यंदाच्या निवडणुकीतही पुनर्वसनाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.

सिद्धार्थ कॉलनी परिसरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होणार याचे गाजर प्रत्येक वेळी दाखविले गेले. इतकेच नव्हे तर तुमचे वीजबिल आम्ही भरू, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर इतरही काही विकासक पुढे आले. कार्यकर्त्यांना फोडाफोडीची स्पर्धा सुरू झाली. अनेक सोसायट्या तयार झाल्या, पण त्या कागदावरच. प्रत्यक्ष कामाला गती मिळाली नाही. तर घाटला भागात एसआरए प्रकल्प रखडला आहे. येथील कोणती घरे पात्र आणि कोणती घरे अपात्र याचा गोंधळ मिटला नाही. लाल डोंगर परिसरात काही ठिकाणी पुनर्वसन झाले आहे तर काही ठिकाणी प्रतीक्षा आहे. चेंबूर कॅम्प परिसरात असलेला ओल्ड बराक असो किंवा सिंधी वसाहतींच्या विकासाचा प्रश्नही मार्गी लागलेला नाही. १५ ते २० वर्षांपासून विकासक आणि स्थानिक रहिवासी यांच्यात करार करण्यात आला आहे़ मात्र विकास रखडला आहे

खारदेवनगरात राजकारण्यांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकासासाठी विकासक ठरविण्याबाबत मतभेद आहेत. विकासकाने पार्किंगसाठीच्या जागेबाबत अंधारात ठेवले आहे. तसेच पुनर्वसन करताना देण्यात येणारे भाडे, चटईक्षेत्र आणि राहतो त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे या मागणीला विकासकाने सहमती दर्शविली नाही.
- महेश मोटे, रहिवासी

सिद्धार्थ कॉलनी भागात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी तीन विकासक आले आहेत. यामधील कोणत्याही विकासकाला ७० टक्के रहिवाशांची संमती मिळाली नाही. आम्हाला संमती मिळाली, असा दावा काही सोसायट्या करत आहेत. त्याबाबत बॅनरबाजी केली जात आहे. पुरेशी संमती न मिळाल्याने याचे काम सुरू झालेले नाही.
- प्रकाश जाधव, रहिवासी

Web Title: Chembur Constituency: When will the constituency leave?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.