चेंबूरचे माँ रुग्णालयच ‘आजारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 02:48 AM2018-04-14T02:48:03+5:302018-04-14T02:48:03+5:30

डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, अपुरी यंत्रसामग्री आणि पायाभूत सुविधांअभावी चेंबूर येथील पालिकेच्या दिवालीबेन मोहनलाल मेहता रुग्णालयात (माँ रुग्णालय) रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Chembur's mother hospital 'sick' | चेंबूरचे माँ रुग्णालयच ‘आजारी’

चेंबूरचे माँ रुग्णालयच ‘आजारी’

googlenewsNext

- अक्षय चोरगे 
मुंबई : डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, अपुरी यंत्रसामग्री आणि पायाभूत सुविधांअभावी चेंबूर येथील पालिकेच्या दिवालीबेन मोहनलाल मेहता रुग्णालयात (माँ रुग्णालय) रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कर्मचारी आणि डॉक्टरांची संख्या कमी असल्याने तासन्तास रुग्णांना रांगेतच उभे राहावे लागते, तर अनेकवेळा खासगी रुग्णालयात जावे लागते. पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
चेंबूर परिसरात पालिकेचे माँ रुग्णालय हे एकमेव शासकीय रुग्णालय आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना या रुग्णालयाशिवाय दुसरा पर्याय नाही. येथे माहुल गाव, पी.एल. लोखंडे मार्ग, गोवंडी, महात्मा फुले नगर, नेहरू नगर, सिद्धार्थ कॉलनी, लाल डोंगर, ठक्कर बाप्पा नगर परिसरातून रुग्ण उपचारासाठी येतात. अनेकदा येथील गर्दी आणि भल्या मोठ्या रांगा पाहून रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये जातात.
माँ रुग्णालयातील ‘क्ष’ किरण विभाग बंद आहे. एमआरआय मशीन आणि सिटी स्कॅन लॅब नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयांशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे उपचारापेक्षा रांगा आणि हेलपाट्यांचा रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत आहे. खासगी रुग्णालये परवडत नसल्याने चेंबूर-गोवंडीमधील रुग्णांना राजावाडी, शताब्दी रुग्णालय किंवा सायन रुग्णालयात जावे लागते.
>औषधांचाही तुटवडा
रुग्णालयात बरीच औषधे उपलब्ध नाहीत. त्यामुळे डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांपैकी काही औषधे रुग्णालयातून व काही औषधे मेडिकलमधून खरेदी करावी लागत असल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले.
>रक्त तपासणी केवळ तासभरच
माँ रुग्णालयात रक्त तपासणीसाठी सकाळी ८ ते दुपारी १२ अशी वेळ आहे. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून येथे केवळ सकाळी ८ ते ९ या वेळेतच रक्त तपासणी केली जाते.
दररोज ३०० ते ३५० रुग्ण सकाळी रक्त तपासणीसाठी रांगेत उभे राहतात, त्यांच्यासाठी फक्त एकच कर्मचारी रुग्णालयात असल्याने अर्ध्या रुग्णांचीच रक्त तपासणी केली जाते. उर्वरित रुग्णांना दुसºया दिवशी या, असे सांगितले जाते.
>रुग्णालयामध्ये कर्मचारीसंख्या अपुरी आहे. ‘क्ष’ किरण तंत्रज्ञ गेल्या पाच महिन्यांपासून रजेवर असल्याने रुग्णांना राजावाडी किंवा शताब्दी रुग्णालयात जावे लागते. रक्त तपासणी विभागात तीन कर्मचारी हवे आहेत. कर्मचाºयांची रिक्त पदे भरण्यात यावीत, यासाठी वैद्यकीय अधीक्षकांकडे मागणी करण्यात आली आहे.
- डॉ. विक्रांत तिकोणे,
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी,
माँ रुग्णालय, चेंबूर
माँ रुग्णालयात कर्मचारी आणि मशीन्सची संख्या अपुरी आहे. त्यामुळे रुग्णांना त्रास होतोय. रुग्णांच्या सोयीसाठी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आय. एन. कुंदन यांच्याकडे मागणी केली आहे. तसेच एम पश्चिम विभागाच्या सहायक आयुक्तांकडेदेखील त्यासंबंधी मागणी केली आहे. कर्मचारी आणि मशीन्स पुरविण्यासह पायाभूत सुविधांकडेदेखील पालिकेचे लक्ष वेधले आहे. - आशा मराठे, नगरसेविका
रिक्त पदे संख्या
आवास अधिकारी
(आरएमओ) ३
मेडिसिन १
शल्य चिकित्सक १
त्वचारोग तज्ज्ञ १
बधिरीकरण १
वैद्यकीय अधिकारी १
मानसेवी सहायक ४
सफाई कर्मचारी ४
एकूण १६

Web Title: Chembur's mother hospital 'sick'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.