चेंबूरचे रेशनिंग कार्यालय बनले भंगाराचे दुकान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:42 AM2018-10-31T00:42:11+5:302018-10-31T00:42:33+5:30
चेंबूरच्या समाजकल्याण कार्यालयामध्ये अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या जीर्ण वाहनांवर काहीच कार्यवाही होत नाही.
मुंबई : वाहतूककोंडी किंवा रोगराईसाठी कारणीभूत असलेली रस्त्यावरील बेवारस वाहने उचलण्याची मोहीम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र धूळ खात पडलेल्या शासकीय वाहनांवर कारवाई होताना दिसत नाही. चेंबूरच्या समाजकल्याण कार्यालयामध्ये अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या जीर्ण वाहनांवर काहीच कार्यवाही होत नाही.
या वाहनांकडे कुणाचे लक्ष जात नसल्याने वाहनांचे पाटर््स चोरी होण्याची शक्यता आहे. अद्याप अशा वाहनांचा लिलावही झाला नाही. त्यामुळे हजारो, लाखो रुपये किमतीची ही वाहने धूळ खात पडून आहेत. जाता-येता कुठेही धूळ खात पडलेले वाहन दिसले किंवा आपण राहत असलेल्या परिसरात एखादे वाहन अनेक दिवसांपासून उभे असल्यास त्या वाहनाचा फोटो, पत्ता आणि वेळ याची माहिती पाठविण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
मात्र चेंबूर येथील समाज कल्याण कार्यालयात वेगवेगळ्या शासकीय विभागांच्या वापरात नसलेल्या जुन्या गाड्या या ठिकाणी जागा अडवून आहेत. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मालकीची असलेल्या या इमारतीमध्ये तळ मजल्यावर सार्वजनिक बांधकाम सेवा केंद्र आणि शिधावाटप कार्यालय आहे. पहिल्या मजल्यावर उद्वाहक निरीक्षक कार्यालय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग कार्यालय आहे. तर दुसऱ्या मजल्यावर अधीक्षक अभियंता मुंबई बांधकाम विभाग, शिक्षण विभाग आणि अल्पबचत संचालनालय यांचे तर तिसºया मजल्यावर विद्युत निरीक्षक आणि आण्णाभाऊ साठे महामंडळ यांचे कार्यालय आहे. याशिवाय चौथ्या मजल्यावर विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्तीय व विकास महामंडळ, पोलीस उपायुक्त झोन ६ आणि चेंबूर साहाय्यक आयुक्त यांची कार्यालये आहेत.
राज्य शासनांतर्गत येणाºया अनेक विभागांची कार्यालये या ठिकाणी असल्याने रोज मोठी गर्दी असते. अधिकाºयांना शासकीय कामाकरिता विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी शासनाने वाहने उपलब्ध करून दिली होती. या वाहनांची कालमर्यादा संपल्याने शासनाने नवीन वाहने उपलब्ध करून दिली. त्यामुळे जुनी वाहने आता अतिशय जीर्ण होऊन भंगारात जमा झाली आहेत. या वाहनांकडे कोणाचेही लक्ष जात नसून अनेक वाहने कार्यालयाच्या मागे धूळ खात पडून आहेत.