Join us

गुन्हे अन्वेषण विभागाची केमिकल गोदामावर धाड

By admin | Published: November 17, 2014 10:47 PM

या गोदामात मानवी जिवितास व प्राणी मात्रास धोका निर्माण होईल अथवा अथवा दुखापत-नुकसान होईल अशा केमिकल पदार्थांची हाताळणी केली जात आहे

काल्हेर : नारपोली येथील निखील वेअर हाऊस या केमीकल गोदामावर भिवंडी गुन्हे अन्वेषण विभागाने धाड टाकून पोलिसांनी गोदाम मालक बाजीराव सदाशिव देशमुख व साहिल चिकणे यांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गोदामात मानवी जिवितास व प्राणी मात्रास धोका निर्माण होईल अथवा अथवा दुखापत-नुकसान होईल अशा केमिकल पदार्थांची हाताळणी केली जात आहे. परंतु उपाय न करता हा साठा बेकायदेशीररित्या साठवून ठेवला होता. या धाडीत पोलिसांना दोन गोदामातून लोखंडी व प्लास्टिक ड्रम मध्ये ठेवलेले विविध प्रकारचे केमिकल सापडले. मात्र यात किती व कोणत्या मालावर कारवाई करून तो जप्त केला याची माहिती पोलिसांनी टाळाटाळ केली. (वार्ताहर)