Join us

रस्त्यावर रासायनिक कचरा

By admin | Published: December 06, 2014 10:14 PM

खाडीतील पाणी प्रदुषणाचा त्रस सहन करणा:या दासगावकरांना आता औद्योगिक वसाहतीतील टाकावू रासायनिक घनकच:याचा त्रस सुरु झाला आहे.

दासगाव :  खाडीतील पाणी प्रदुषणाचा त्रस सहन करणा:या दासगावकरांना आता औद्योगिक वसाहतीतील टाकावू रासायनिक घनकच:याचा त्रस सुरु झाला आहे. दोन दिवसांपूर्वी कोणीतरी अज्ञात वाहनाने मुंबई - गोवा महामार्गालगत दासगाव खिंडीत घातक रासायनिक कचरा टाकला आहे. या रासायनिक घनकच:यामुळे दासगावमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सावित्री नदी किनारी दासगाव हे गाव वसले आहे. निसर्गरम्य अशा या परिसराला 3क् वर्षापूर्वी नजर लागली. बारमाही वाहणारी आणि ग्रामस्थांच्या उदरनिर्वाहाचे मूळ स्त्रोत असणारी सावित्री नदी प्रदुषित झाली. याचा परिणाम येथील जनजीवनावर चांगलाच झाला. अनेक कुटुंब नोकरी व्यवसाय निमित्ताने विस्थापित झाली. तर अनेकांनी मोलमजुरीचा मार्ग पत्करला. अनेकांना श्वसनाच्या दुर्धर रोगांनी ग्रासले. प्रदुषणाचे हे भीषण चटके रसायनिक कचरा भरलेल्या निळय़ा रंगाच्या प्लॅस्टिकच्या गोणीत टाकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या गोणीमुळे परिसरात वा:या सोबत दरुगधी पसरत आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
उल्हासनगरमधील वायूप्रदूषणाचे प्रकरण जाते असताना आता महाड परिसरातही अशाच घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रासायनिक कच:यामुळे जिवीतास धोकाही उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने योग्य दाखल घेऊन  हा कचरा टाकणा:यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. 
 
दासगाव खिंडीत पडलेल्या या रासायनिक घनकच:याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. परिसरात त्रस नको म्हणून लागलीच तो घनकचरा तेथून उचलून कारखाना अगर सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रामार्फत त्याची विल्हेवाट लावली जाईल.
- गजानन पवार, 
क्षेत्रिय अधिकारी प्रदुषण नियंत्रण मंडळ महाड.