रासायनिक जलवाहिनी फुटली

By admin | Published: February 11, 2015 10:41 PM2015-02-11T22:41:54+5:302015-02-11T22:41:54+5:30

एमआयडीसीचे रासायनिक सांडपाणी कुंडलिका नदीत मिसळत असल्याने परिसरातील गुरेढोरे, मासे सतत मरून पडत आहेत.

Chemical water cut | रासायनिक जलवाहिनी फुटली

रासायनिक जलवाहिनी फुटली

Next

रोहा : एमआयडीसीचे रासायनिक सांडपाणी कुंडलिका नदीत मिसळत असल्याने परिसरातील गुरेढोरे, मासे सतत मरून पडत आहेत. शेकडो एकर शेतजमीन नापिक झाली आहे. कुंडलिकेच्या काठावरील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागते, याची ओरड असतानाच एमआयडीसीची रासायनिक सांडपाणी वाहक जलवाहिनी मंगळवारी दमखाडीजवळील कुंडलिका नदीकाठी फुटली. हे रासायनिक सांडपाणी कुंडलिकेत मिसळल्याने नदीचे पाणी दूषित झाले आहे, तर काही महिन्यांपूर्वीची करोडो रुपये खर्चित ही नवी योजना निकामी असल्याचे उघड झाले आहे.
धाटाव औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांचे विषारी सांडपाणी कुंडलिकेपासून दूर खाडीत सोडण्याऱ्या पीव्हीसी जलवाहिनीवर काही महिन्यांपूर्वी करोडोंचा खर्च करण्यात आला. त्यावेळी या योजनेच्या कामांवर अनेकांनी आक्षेप घेतला. काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. जलवाहिनी रस्त्याशेजारीच टाकली जाते. त्यामुळे भविष्यात धोका निर्माण होईल? पण एमआयडीसीचे अधिकारी ऐकण्याच्या तयारीत नव्हते. तद्नंतर ही योजना कमालीची वादग्रस्त ठरली होती. थेट विधानसभेत प्रश्न उपस्थित झाला आणि काही राजकारणी व अधिकारी मिलीभगत असल्याचे आरोपही झाले होते. तोच हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या अगोदरच जलवाहिनी काही ठिकाणी निकामी झाल्याने एमआयडीसी अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जावे, अशी मागणी बचाव समिती, कोळी संघर्ष समितीकडून होत आहे.
एमआयडीसी सांडपाणी योजना धाटाव व आरे खाडीपर्यंत राबविण्याचा प्रस्ताव आहे. मात्र योजनेचे काम थांबल्याने रासायनिक पाणी कुंडलिकेत जाते. हे स्पष्ट असूनही संबंधित प्रशासनाकडून सुरक्षेबाबत उपाययोजना केल्या नाहीत. याबाबत एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी कळसकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्यासह सर्वच अधिकारी संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे संदेश येत होते.
(वार्ताहर)

Web Title: Chemical water cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.