'या दिवशी कोरोनाची लस सर्वसामान्यांच्या हातात असेल', चेतन भगत यांनी वर्तविले भाकित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 04:31 PM2020-08-06T16:31:29+5:302020-08-06T16:43:07+5:30
अलीकडेच चेतन भगत यांनी राम मंदिर भूमिपूजन संदर्भात ट्विट केले होते, जे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
नवी दिल्ली : प्रसिद्ध लेखक चेतन भगत सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. ते प्रत्येक विषयावर आपले मत मांडताना दिसतात. अलीकडेच अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनानंतर त्यांनी कोरोना लससंदर्भात एक रोचक ट्विट केले आहे. जे सध्या बर्यापैकी व्हायरल होत आहे.
आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करताना चेतन भगत यांनी लिहिले, "जगभरातील शेअर बाजाराकडे, विशेषत: अमेरिकेच्या शेअर बाजाराकडे पाहता असे दिसते की कोरोना लस लवकरच येत आहे. मला वाटते की ऑक्टोबर 2020 पर्यंत सर्व चाचण्या पूर्ण होतील. मंजुरी डिसेंबर 2020 पर्यंत उपलब्ध होईल. 2021 फेब्रुवारीपर्यंत ही लस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल."
Stock markets around the world, especially the USA, indicate the vaccine is coming soon.
— Chetan Bhagat (@chetan_bhagat) August 6, 2020
My guess:
All trials done: by October 2020
Regulatory approvals: by December 2020
In your arm: by Feb 2021
चेतन भगत यांच्या या ट्विटला आतापर्यंत 99 जणांनी रिट्विट आणि एक हजारहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. एवढेच नाही तर यावर अनेकांनी कमेंट्स सुद्धा केली आहे. चेतन भगत यांनी एक तासापूर्वी हे ट्विट केले असून या ट्विटला हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. 'आशा आहे असेच होईल, असे एका सोशल मीडिया युजर्सने या ट्विटला कमेंट केली आहे. दुसऱ्या युजर्सने म्हटले आहे, आशा आहे की आपण जे म्हणत आहात ते खरे आहे. त्याचबरोबर अनेक वापरकर्त्यांनी ट्विटवर लाईक्स आणि स्माइली दर्शविणार्या इमोजीसह प्रतिक्रिया दिल्या आहेत.
चेतन भगत यांच्या अनेक पुस्तकांवर बॉलिवूडमधील चित्रपटही बनले आहेत. अलीकडेच चेतन भगत यांनी राम मंदिर भूमिपूजन संदर्भात ट्विट केले होते, जे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ट्विटमध्ये चेतन भगत यांनी श्री राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल लोकांचे अभिनंदन केले आहे आणि म्हटले आहे की, भगवान राम यांच्या देखरेखीखाली भारत संधी, समृध्दी, प्रेम, सौहार्द, अखंडता आणि बंधुता असा देश बनला पाहिजे. चेतन भगत यांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
आणखी बातम्या...
CoronaVirus News : लस तयार होण्यासाठी नेमका किती लागतो कालावधी?
राम मंदिर भूमिपूजनाचे औचित्य साधून 50 मुस्लीम कुटुंबीयातील 250 सदस्यांनी स्वीकारला हिंदू धर्म!
Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा नेत्याची हत्या, दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या
मनोज सिन्हा होणार जम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल; गिरीशचंद्र मुर्मू यांचा राजीनामा स्वीकारला