चेतनच्या पत्नीची होती घटस्फोटाची तयारी; ग्रँट रोड रहिवासी हल्ला प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 06:06 AM2023-03-28T06:06:37+5:302023-03-28T06:08:29+5:30
शेजाऱ्यांमुळे पत्नी सोडून गेल्याच्या रागात शेजाऱ्यांवर वार करणारा चेतन गाला सध्या पोलिस कोठडीत आहे.
मुंबई : शेजाऱ्यांमुळे पत्नी सोडून गेल्याच्या रागात शेजाऱ्यांवर वार करणारा चेतन गाला सध्या पोलिस कोठडीत आहे. पती-पत्नीची भांडणे एवढी टोकाला गेली होती की, चेतनची पत्नी घटस्फोट घेण्याच्या तयारीत होती, अशी माहिती समोर येत आहे.
ग्रँट रोड येथील पार्वती मॅन्शनमध्ये चेतन गाला राहण्यास आहे. तो कामधंदा करत नसल्याने दोन महिन्यांपूर्वी पत्नीने मुलांसह घर सोडले. यादरम्यान, पत्नीला घाबरविण्यासाठी त्याने तिला घरी येणार नसेल तर घटस्फोट देण्यास सांगितले. चेतनच्या स्वभावाला कंटाळून पत्नीनेही घटस्फोटाची तयारी दर्शवली होती. दरम्यान, हल्ल्यात जखमी झालेल्या स्नेहल ब्रह्मभट्ट यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत आहे.