Chhagan Bhujbal ( Marathi News ) : शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होत असल्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या गोष्टीचा निषेध करत महाड येथे चवदार तळ्याजवळ आंदोलन केले. या आंदोलनावेळी आव्हाडांकडून मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले. पण यावेळी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टरही फाडण्यात आल्याचं समोर आलं आहे. यावेळी आव्हाड यांनी माफिही मागितली आहे. दरम्यान, आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर राजकीय वर्तुळात आरोप सुरू आहेत. यावरुन काल मंत्री छगन भुजबळ यांनी आव्हाड यांची बाजू घेतली. यावर आता भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. या टीकेला छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले.
"३०० च्या वर जागा इंडिया आघाडी जिंकेल"; नाना पटोलेंचा मोठा दावा, महाराष्ट्रातीलही आकडा सांगितला
"दरेकर काय म्हणाले हा त्यांचा प्रश्न आहे, आव्हाडांना विरोधासाठी विरोध करु नका. मुख्य मुद्दा मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात प्रवेश होता कामा नये हा आहे, त्याचा निषेध करा, त्याचा विरोध करा. पहिल्यांदा शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती नको हे सांगा, नंतर जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करा. आव्हाड विरोधक आहेत त्यांचा विरोध निश्चितच करा, आमचं काही म्हणणं नाही, असंही भुजबळ म्हणाले.
"आधी ती मनुस्मृती जाळा जी बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळली होती.फक्त विरोधासाठी विरोध नाही, आमची जी आयडीयालॉजी आहे फुले, शाहू, आंबेडकरांची मनुस्मृतीच्या विरोधात उभं राहणं, त्याच्यासाठी जो, जो उभा राहिलं त्यांच्या हातून जर चूक झाली तर आम्ही सांगतो झाली चूक. मुंबईतून ते चवदार तळ्यावर गेले होते त्यांच्याहातून चुकून झालं, त्याच्यामागे मनुस्मृती जाळणे ही भावना होती, आता त्यांना शिक्षा काय करायची ती करा माझं काही म्हणणे नाही. तो अधिकार तुम्हाला तुम्ही स्वत: ज्यावेळी मनुस्मृतीच्या विरुद्ध भूमिका घ्याल तेव्हा येतो.ज्यावेळी तुम्ही स्वत: मनुस्मृती जाळाल तेव्हा तुम्हाला तो अधिकार येईल, असंही मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
"महायुतीमध्ये नाराज नाही"
"मी महायुतीमध्ये नाराज नाही, मी समता परिषदेचा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा पाईक आहे. मी अशा गोष्टींमध्ये स्पष्ट बोलतो. खोटं बोलणं मला जमत नाही. विरोधासाठी विरोध मी करु शकत नाही, असंही छगन भुजबळ म्हणाले.