Jayant Patil ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून मंत्री छगन भुजबळ राज्य सरकारविरोधात बोलत आहे. दोन दिवसापूर्वी भुजबळ यांनी मनुस्मृतीवरुन आमदार जितेंद्र आव्हाड यांची बाजू घेऊन राज्य सरकारला सुनावलं. यामुळे आता छगन भुजबळ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत की शरद पवार गटात आहेत. या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दरम्यान,या चर्चांवर 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.
उद्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबतीत भाष्य केले.
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
"उद्या सर्व चित्र स्पष्ट होईल, २०१९ मध्ये पुलवामामुळे भाजपाच्या जागा वाढल्या होत्या. आता तशी परिस्थिती नाही, आता सध्या उघड प्रतिक्रिया कोण देत नाही, पण एकदा पडायला सुरुवात झाली तर मोठ्या प्रमाणात पिछाडी होऊ शकते, असंही जयंत पाटील म्हणाले. यावेळी जयंत पाटील यांना पत्रकारांनी छगन भुजबळ गेल्या काही दिनवसापासून राज्य सरकारच्या विरोधात बोलत आहेत, ते कोणत्या पक्षात आहेत असा प्रश्न केला. या प्रश्नावर बोलताना पाटील म्हणाले, तुम्ही मला उद्या निकालानंतर भेटा, निकालानंतर सांगेन. पाटील यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.
मी पक्ष सोडणार नाही: पाटील
"मी पक्ष सोडणार नाही, आमच्या बाबतीत संभ्रम निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहे. कुणीही त्यांना बळी पडू नका. अनेकजण आम्हाला आमंत्रण देत असतात, त्याचा कामावर परिणाम होत नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.
'ठाकरेंनी गचाळ कारभारावर आक्षेप घेतला'
मुंबईकरांना तासनतास रांगेत उभं रहावं लागलं. उद्धव ठाकरेंनी गचाळ कारभारावर आक्षेप घेतला आहे. हा आक्षप व्यक्त करणे काही चुकीचे नाही. निवडणूक आयोगाने जी तत्परता दाखवायला हवी होती ती दाखवली नाही, असंही पाटील म्हणाले.
गेल्या काही दिवसापासून महागाई वाढली आहे, आता टोल वाढीचं नवं संकट आलं आहे.विजेचे दर वाढत आहेत, लोकांच्या नाराजी आहे. ही नाराजी उद्या निकालात दिसेल, असं मला वाटतं, असंही पाटील म्हणाले.