Chhagan Bhujbal resigned ( Marathi News ) : आज अहमदनगर येथे ओबीसी समाजाचा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलतामा मंत्री छगन भुजबळ यांनी मत्रिपदावरुन मोठा गौप्यस्फोट केला. मी १७ नोव्हेंबरलाच मंत्री पदाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
"भुजबळ साहेब यांचा आम्ही किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणताही राजीनामा स्विकारलेला नाही. याबाबत मुख्यमंत्रीच सांगू शकतील, असं स्पष्टीकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
मराठा आरक्षणाची मागणी गेल्या काही दिवासापासून सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे, मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीतून आरक्षणास विरोध केला आहे. यावर आता ओबीसी समाजाचे राज्यभर मेळावे सुरू आहेत. यामुळे भुजबळ यांच्या मंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर आता आज भुजबळ यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
१६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
आज ओबीसी मेळाव्यात बोलताना भुजबळ म्हणाले, मी अशी भाषणे करतो, सरकारमधले, विरोधी पक्षातील सगळे बोलतात, तुम्ही राजीनामा द्या, हिंमत असेल तर राजीनामा द्या. माझ्या सरकारमधीलही नेते बोलतात. काल-परवा एकजण बडबडला. या भुजबळाला कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळाला बाहेर हाकला असं म्हणाला. मला त्या सर्वांना विरोधी पक्ष, स्वपक्षातील, सरकारला सांगायचे आहे. १७ नोव्हेंबरला जालनातील अंबडला रॅली झाली. १६ नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. त्यानंतर अंबडच्या सभेला रवाना झालो. लाथ मारण्याची मला गरज नाही. अडीच महिने मी शांत राहिलो, याची वाच्यता नको असं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. लाथ मारायची गरज नाही. मी शेवटपर्यंत ओबीसीसाठी लढणार आहे असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी केला.