Join us

आरक्षणाबाबत भुजबळांची ऑडिओ क्लिप व्हायरल, रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, 'राजकीय अस्तित्व...;

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 2:17 PM

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभा केलं आहे.

मुंबई-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभा केलं आहे. आता सरकारला जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंत वेळ वाढवून दिला आहे, दरम्यान, आता ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध होत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता मंत्री छगन भुजबळ यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामुळे आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 

अन्याय होत असेल तर बोलायला हवे, दहशत माजवावीच लागेल; सरसकट मराठा प्रमाणपत्राला भुजबळांचा विरोध

मंत्री छगन भुजबळ यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये, 'आता करेंगे मरेंगे…आता तुम्ही आवाज उठवा, मी एकटा कुठपर्यंत लढणार,असंही मरतोय आणि तसंय मरतोय…आपण आता उभं राहिला पाहिजे, असे म्हणत भुजबळांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, त्यांची ऑडिओ क्लिप मी ऐकलेली नाही. समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा, वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न होत असेल तर आपण निषेध हा केलाच पाहिजे. कुठेही वाद होणार नाही याची दक्षता घ्यावी, असंही रोहित पवार म्हणाले. 

" राजकीय अस्तित्व टीकवण्यासाठी जर कुणी वेगळ्या पद्धतीची भूमिका घेत असेल तर ते योग्य नाही. सगळ्यांचच मत आहे चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे, त्यामुळे ही व्हिडीओ क्लिप खरी, खोटी या खोलात न जाता. कुणीही यात वाद होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, असंही रोहित पवार म्हणाले. 

सरसकट मराठा प्रमाणपत्राला भुजबळांचा विरोध

आज मंत्री छगन भुजळ जालना दौऱ्यावर गेले आहेत, यावेळी त्यांनी सरसकट मराठा प्रमाणपत्राला विरोधा केला. यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले,आपल्यावर अन्याय होत असेल तर आपल्याला बोलायला पाहिजे, जर आपण गप्प बसलो तर आपल्याला कोणीही मदत करायला येणार नाही. त्यामुळे आता थोडी दहशत माजवायची आणि जे पाहिजे करुन घ्यायचे, समोरच्या दरवाज्यातून प्रवेश मिळत नाही म्हणून मागच्या दरवाज्यातून प्रवेश मिळवायचे काम सुरू आहे, आमचा मराठा आरक्षणाचा विरोध नाही, असंही छगन भुजबळ म्हणाले. 

"मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, आमचा आरक्षणाला विरोध नाही. आमच्या आरक्षणात तुम्ही येऊ नका, ३७५ पेक्षा जास्त जाती आमच्या आहेत. ५४ टक्क्यांपेक्षा जास्त आमचे  गोरगरीब लोक आहेत. मी आज संध्याकाळी या गोष्टी मांडणार आहे. तुम्ही सगळ्यांनी एका आवाजात बोलले पाहिजे, बोलला नाहीत तर मुलांचं भविष्य धोक्यात येणार आहे, असंही छगन भुजबळ म्हणाले. 

टॅग्स :रोहित पवारराष्ट्रवादी काँग्रेसओबीसी आरक्षणछगन भुजबळमराठा आरक्षण