भाजपकडून छगन भुजबळांना पक्षप्रवेशाची ऑफर? प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 10:49 PM2023-11-23T22:49:33+5:302023-11-23T22:53:12+5:30

सरकारमधील जबाबदार पदावरील मंत्री छगन भुजबळ हे मराठा आंदोलनावर आरोप करत आहेत. त्यांना भाजपकडून काही ऑफर आली असावी, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

Chhagan Bhujbal's offer to join the party from BJP? State president Chandrasekhar Bawankule disclosed | भाजपकडून छगन भुजबळांना पक्षप्रवेशाची ऑफर? प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला खुलासा

भाजपकडून छगन भुजबळांना पक्षप्रवेशाची ऑफर? प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला खुलासा

मुंबई- गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाच्या मागणी आंदोलन सुरू आहे, मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंत सरकारला वेळ दिला आहे. तर दुसरीकडे ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध सुरू आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी मोठा मेळावाही घेतला, यावरुन आता जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, "सरकारमधील जबाबदार पदावरील मंत्री छगन भुजबळ हे मराठा आंदोलनावर आरोप करत आहेत. त्यांना भाजपकडून काही ऑफर आली असावी, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे, यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत भाजपकडून अशी कोणताही ऑफर देण्यात आलेली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मंत्री छगन भुजबळ यांना आम्ही कोणतीही ऑफर दिलेली नाही हे मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून जबाबदारीने करतो. भुजबळ यांनीही आमच्यासोबत अशी कोणतीही चर्चा केलेली नाही. ते सध्या आमच्यासोबतच आहेत, असं स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं. येणारी पुढची निवडणूक आम्ही अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासोबत लढणार आहोत. २०२४ मध्ये सव्वा दोनशेच्या वर महायुतीचे आमदार निवडून येतील, असंही बावनकुळे म्हणाले. 

भुजबळांना भाजपकडून ऑफर, जरांगे पाटलांचा आरोप

मनोज जरांगे पाटील यांनी काय बोलावं हे त्यांनी ठरवावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर आरक्षण देण्याची शपथ घेतली आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत आहेत, असंही बावनकुळे म्हणाले. 

भुजबळांना भाजपकडून ऑफर, जरांगे पाटलांचा आरोप

सरकारमधील जबाबदार पदावरील मंत्री छगन भुजबळ हे मराठा आंदोलनावर आरोप करत आहेत. त्यांना भाजपकडून काही ऑफर आली असावी, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे त्यांना आवरत नाहीत, अशी टीका त्यांनी केली आहे.

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे श्रीरामपूर येथे बुधवारी रात्री सभेसाठी आले होते. त्यानंतर ते येथे मुक्कामी होते. गुरुवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भुजबळ यांच्यावर टीका केली.

मंत्री भुजबळ हे मराठा समाजाविरूद्ध बोलत आहेत. त्यावर उपमुख्यमंत्री काहीच प्रतिक्रिया नोंदवत नाहीत. ते भुजबळ यांना थांबवत नाहीत. त्यामुळे मराठा समाजाला त्रास देण्यासाठी हे सर्व सुरू आहे का? अशी शंका येते. उपमुख्यमंत्री फडणवीस हे काहीच बोलत नसल्यामुळे शंका येत आहे. भुजबळ यांना भाजपमध्ये पलटी मारायची असावी. कारण त्यांना तशी सवय आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक वेळा पलटी मारली आहे. मराठा समाजाच्या लेकरांचे वाटोळे करण्यासाठी सरकारने भुजबळांना फूस लावली नाही ना? अशी टीका जरांगे पाटील यांनी केली.

Web Title: Chhagan Bhujbal's offer to join the party from BJP? State president Chandrasekhar Bawankule disclosed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.