महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमी सज्ज, मुंबई महापालिकेचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 02:57 AM2017-12-05T02:57:57+5:302017-12-05T02:58:00+5:30
राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी परिसर, शिवाजी पार्क परिसर, दादर रेल्वे स्थानक, राजगृह
मुंबई : राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी परिसर, शिवाजी पार्क परिसर, दादर रेल्वे स्थानक, राजगृह (हिंदू कॉलनी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक (कुर्ला) टर्मिनस येथे आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. या सर्व ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी पुरविण्यात येत असलेल्या नागरी सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा, असे महापालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मंगळवारी सकाळी १० वाजता शिवाजी पार्क येथील माहिती कक्षात करण्यात येणार आहे. अनुयायांना चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसर लांबून ओळखता यावा यासाठी दोन्ही ठिकाणी दिशादर्शक फुगे आकाशात सोडले जाणार आहेत. विशेष बाब म्हणजे या वर्षीदेखील शिवाजी पार्क व्यतिरिक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथेही तात्पुरत्या निवाºयासह फिरती शौचालये, स्नानगृहे व पाण्याची व्यवस्था केली आहे.
दरम्यान, ओखी वादळाचा परिणाम म्हणून सोमवारी पडलेल्या पावसामुळे चैत्यभूमी येथे दाखल झालेल्या अनुयायांचे मोठे हाल झाले़ यावर उपाय म्हणून महापालिकेतर्फे शिवाजी पार्कलगत असलेल्या गोखले रोड महापालिका शाळेत अनुयायांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली.
येथे वाहने उभी करण्यास प्रतिबंध
एस. व्ही. एस. रोड
रानडे रोड
एन. सी. केळकर रोड
केळुस्कर रोड (दक्षिण), केळुस्कर (उत्तर)
गोखले रोड, दक्षिण व उत्तर
टिळक ब्रीज
भवानी शंकर रोड
एस. के. बोले मार्ग.
येथे वाहने उभी करण्यास बंदी
सेनापती बापट मार्ग
फाइव्ह गार्डन्स, माटुंगा
माहिम रेती बंदर
आवश्यक नागरी सेवा-सुविधा
चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे शामियाना व व्हीआयपी कक्षासह नियंत्रण कक्षाची व्यवस्था, नियंत्रण कक्षाशेजारी, चैत्यभूमी प्रवेशद्वाराजवळ व सूर्यवंशी सभागृह मार्ग या ३ ठिकाणी रुग्णवाहिकेसहित आरोग्य सेवा, १ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरता निवारा, शिवाजी पार्क मैदान व परिसरात १६ फिरती शौचालये, रांगेत असणाºया अनुयायांसाठी ४ फिरती शौचालये, ३२० पिण्याच्या पाण्याच्या नळांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचे १५ टँकर्स, विद्युत व्यवस्था, अग्निशमन दलामार्फत आवश्यक ती सेवा
चौपाटीवर सुरक्षारक्षकासहित बोटीची व्यवस्था, मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण, ५१९ स्टॉल्सची रचना, जी/उत्तर, दादर (पश्चिम) रेल्वे स्थानकाजवळ आणि एफ/उत्तर, दादर (पूर्व) स्वामिनारायण मंदिराजवळ नियंत्रण कक्ष/माहिती कक्ष, राजगृह येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष, स्काऊट गाइड हॉल येथे भिक्खू निवासाची व्यवस्था, मैदानात धुळीचा त्रास रोखण्यासाठी पायवाटांवर आच्छादनाची व्यवस्था
अनुयायांना मार्गदर्शनाकरिता १०० फूट उंचीचे चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसर येथे निदर्शक फुग्याची व्यवस्था, भ्रमणध्वनी चार्जिंगकरिता मैदानात ३०० पॉइंटची व्यवस्था, २०० फायबरच्या तात्पुरत्या न्हाणीघरांची व ६० फायबरच्या तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था, इंदू मिलच्या मागे ६० फायबरच्या तात्पुरत्या शौचालयाची व ६० फायबरच्या तात्पुरत्या स्नानगृहांची व्यवस्था, रांगेतील अनुयायांसाठी तात्पुरते छत असलेल्या ५० बाकड्यांची व्यवस्था यांचा समावेश आहे.
बांधकाम कामगारांत जनजागृतीसाठी स्टॉल
महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी ६ डिसेंबरला दादर येथील चैत्यभूमी परिसरात जमा होणाºया जनतेमध्ये बहुजन समाजातील कामगारांचा सहभाग मोठ्या संख्येने असतो. या कामगारांत आणि सामान्य जनेतमध्ये जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाला शिवाजी पार्कमध्ये मुंबई महानगपालिकेकडून स्टॉल क्रमांक २०७ उपलब्ध करून देण्यात आला आहे. या स्टॉलवर बांधकाम कामगारांच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती पुस्तिका, माहिती पत्रक आणि नोंदणी अर्ज मोफत वितरण केले जातील. यावेळी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, कामगार आयुक्त यशवंत केरुरे, मंडळाचे सचिव उपस्थित राहणार आहेत.
चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर चौपाटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राजगृह, आंबेडकर कॉलेज इत्यादी ठिकाणी २८२ अतिरिक्त मार्गप्रकाश दिवे बसविण्यात आले आहेत. या मार्गप्रकाश दिव्यांच्या देखभालीकरिता एरियल लिप्ट व वॉकीटॉकीने सुसज्ज असलेली ३ पथके शिवाजी पार्क मैदान, चैत्यभूमी व संजगिरी लेन या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. वीजपुरवठा अखंडित ठेवण्याकरिता राखीव (स्टॅण्डबाय) पथकांची नेमणूक शिवाजी पार्क मैदान, चैत्यभूमी, ओम अपार्टमेंट उपकेंद्र या ठिकाणी करण्यात आली आहे. दादर चौपाटी, महापौर निवास व ज्ञानेश्वर उद्यान या ठिकाणी ३ सर्च लाइट्स (शोध दिवे) मनोºयावर बसविण्यात आले आहेत.
दादर स्थानक (पश्चिम) येथून शिवाजी पार्क दरम्यान बसमार्ग क्रमांक दादर फेरी-२ या बसमार्गावर संपूर्ण दिवस अतिरिक्त बस फेºया कार्यान्वित करण्यात येणार आहेत. विशेषत: ५ डिसेंबर रोजी संपूर्ण रात्र व ६ डिसेंबर रोजी २४ तास बससेवा कार्यरत राहील.
बोरीवली रेल्वे स्थानक (पूर्व) येथून कान्हेरी गुंफा दरम्यान बसमार्ग क्रमांक १८८ वर सकाळी ९ वाजता ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बससेवा चालविण्यात येणार आहे. तसेच बोरीवली स्थानक (पश्चिम) येथून गोराई खाडी दरम्यान सकाळी ९ वाजता ते रात्री १० वाजेपर्यंत बसमार्ग क्रमांक २४७/२९४ या बसमार्गांवर अतिरिक्त बससेवा चालविण्यात येणार आहे.
मालाड स्थानक (पश्चिम) आणि मार्वे चौपाटी दरम्यान सकाळी ९ वाजता ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बसमार्ग क्रमांक २७२ वर बससेवा चालविण्यात येणार आहे.
मुंबई शहराच्या विविध भागांतील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधातील स्मृतिस्थळांना / वास्तूंना भेट देण्याची इच्छा असणाºयांसाठी बेस्ट उपक्रमाच्या वतीने याकरिता या वर्षी विशेष बससेवा चालविण्यात येतील. या बससेवेकरिता प्रतिप्रवासी १५० रुपये प्रवासी भाडे आकारण्यात येणार आहे. या बसफेºया सकाळी ८, ८.३०, ९, ९.३० आणि १० वाजता शिवाजी पार्क (सेनापती बापट पुतळा, दादासाहेब रेगे मार्ग) येथून चालविण्यात येतील. या बसफेºयांचे तिकीट शिवाजी पार्क आणि वीर कोतवाल उद्यान (प्लाझा) येथे उपलब्ध आहे.
शिवाजी पार्क बसचौकी (सेनापती बापट पुतळा), शिवाजी पार्क मैदान येथील तंबंूच्या परिसरात ‘प्रवासी माहिती केंद्र’ उपलब्ध करण्यात येणार असून सदर ठिकाणी ७ डिसेंबरपर्यंत दैनंदिन बसपास वितरित केले जातील.