मुंबई : औरंगाबाद येथील विमानतळाचे नाव बदलून ते छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्याची घोषणा गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली.तत्पूर्वी राज्य मंत्रिमंडळाने या बाबतचा निर्णय घेतला.मुख्यमंत्री म्हणाले की, विमानतळाचे नामांतर करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मागणी होत आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद महापालिकेने देखील धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ असे नाव करण्याबाबत ठराव संमत केला आहे. तसेच लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावास मान्यता दिली असून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे तो पाठविण्यात येईल. आतापर्यंत या विमानतळाचे नाव चिखलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ; औरंगाबाद असे होते.
औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, मंत्रिमंडळाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 05:19 IST